ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दिवगंत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या जयंती निमित्य दौड स्पर्धेचे आयोजन

मराठा चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने हाफ मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आणि त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेली भव्य 21 किलोमीटर हाफ मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. विदर्भातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने युवक, युवती तसेच ज्येष्ठ नागरिकांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

दिवगंत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मरणार्थ मराठा चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर च्या वतीने या दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

भद्रावतीतील बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार येथून खासदार प्रतिभा धानोरकर आणि पार्थ धानोरकर यांच्या हस्ते शांततेचे प्रतीक असलेले कबूतर उडवून तसेच हिरवी झेंडी दाखवत स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला.

भद्रावती ते पडोली चौक, चंद्रपूर असा तब्बल 21 किलोमीटरचा लांब पल्ला स्पर्धकांनी मोठ्या जिद्दीने पूर्ण केला. स्पर्धेत महिला आणि पुरुष अशा दोन्ही गटांमध्ये विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

विशेष म्हणजे या हाफ मॅरेथॉन स्पर्धेत जिल्ह्यासह इतर नागपूर, गोंदिया, वर्धा, नागपूर, यवतमाळ गडचिरोली जिल्यातील युवक युवती, व जेष्ठ नागरिकांचा सहभाग व्याख्यानाजोगा होता.

यावेळी काँग्रेस नेते प्रवीण काकडे यांच्यासह अनेक नगरसेवक, काँग्रेस चे तालुका व शहर पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक, क्रीडा ,शैक्षणिक आणि व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी आवर्जून उपस्थित होते.

स्पर्धेदरम्यान भद्रावती पोलीस स्टेशनचे निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. संपूर्ण स्पर्धा अत्यंत शिस्तबद्ध, सुरक्षित आणि नियोजनबद्ध वातावरणात पार पडली.

हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या हाफ मॅरेथॉनने आरोग्य, फिटनेस आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देत परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये