ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शरदराव पवार महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन

"शाश्वत विकासासाठी युवाशक्ती" या संकल्पनेवर स्मार्ट ग्राम बीबी येथे शिबिर आयोजित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

शरदराव पवार महाविद्यालय गडचांदुर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचां उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला .सदर शिबिर जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी या ठिकाणी शाश्वत विकासासाठी युवाशक्ती या संकल्पनेवर आयोजित करण्यात आले आहे.

      शिबिराचे उद्घाटन संस्थेचे सचिव नामदेवराव बोबडे यांच्या हस्ते संपन्न झाले,तर अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.आनंदराव अडबाले होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सदस्य माधवराव मंदे,प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह, गोंडवाना विद्यापिठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. संजय गोरे, बीबी ग्रामपंचायतच्या सरपंच सौ.माधुरी टेकाम , ग्रामविस्तार अधिकारी धनराज डुकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

          याप्रसंगी उद्घाटक नामदेवराव बोबडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सामुदायिक शिक्षणाचे महत्त्व सांगितले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ . आनंदराव अडवाले यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सामाजिक सेवेची संधी प्राप्त होते असे प्रतिपादन केले . प्रमुख अतिथी माधवराव मंदे यांनी आपले विचार याप्रसंगी मांडले.प्राचार्य डॉ. संजयकुमार सिंह यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विविध उपक्रम विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महत्त्वाचे आहेत असे प्रतिपादन केले .डॉ.संजय गोरे यांनी प्रास्ताविक पर भाषणातून राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व सांगितले

      सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी प्रा. शरद बेलोरकर यांनी केले तर आभार प्रा .डॉ. माया मसराम यानी मानले सदर कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक व शिबिरात सहभागी स्वयंसेवक महाविद्यालयाचे प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , ग्रामपंचायत बीबी चे कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये