Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

वर्ग १२ वी च्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण निरोप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

– नांदा येथील श्री प्रभु रामचंद्र कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग१२वी च्या विद्यार्थ्यांना वर्ग ११वी च्या विद्यार्थ्यांन कडून 18 जानेवारी रोजी भावपूर्ण निरोप देण्यात आला. कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या निरोप सोहळ्यात विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

सोहळ्यात वर्ग १२वी च्या विद्यार्थ्यांनी आपआपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमांची सुरुवात दीपप्रज्वलना ने झाली .कार्यक्रमाचे अध्यक्ष पद वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळ,नांदा चे अध्यक्ष माननीय श्री. जनार्दन ढोले यांनी भुषविले.

संस्थेचे सचिव तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य अनिलराव मुसळे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करुन भावी आयुष्या करीता शुभेच्छा दिल्या.वर्ग १२वी चे वर्ग शिक्षक बोबाटे सर,सातपुते सर, मुसळे मॅडम,nबल्की मॅडम, हजारे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वर्ग ११वी ची विद्यार्थ्यांनी कु.दिक्षा पिंपळकर व कु. अनुष्का कुईटे हीने केले. व आभार प्रदर्शन कु. सलोनी रणवीर हीने केले.या कार्यक्रमाच्या यशस्वी ते साठी दुमोरे सर,  दुर्योधन सर, बांगडे सर,लालसरे सर,सौ. विरुटकर मॅडम तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी  मेश्राम भाऊ, आत्रामभाऊ यांचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये