दीनदयाल विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
दे.राजा :- शिक्षण प्रसारक मंडळ चिखली द्वारा संचालित दीनदयाल विद्यालय व कनिष्ठ कला आणि विज्ञान महाविद्यालय दे.राजा येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री. भगवानराव आरसोडे, पर्यवेक्षक श्री.राजेशजी भिवटे, जेष्ठ शिक्षक श्री.हरीभाऊ बिडवे, श्री.राजुशिंग राठोड, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणुन बोलत असतांना श्री.संदीप डोईफोडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य सर्वव्यापी आणि असामान्य अश्या स्वरूपाचे आहे असे प्रतिपादन केले. कार्यक्रम अध्यक्ष प्राचार्य श्री. भगवानराव आरसोडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यातून विद्यार्थ्यानी प्रेरणा घेऊन अभ्यास करावा असे आवाहन केले.
या संपुर्ण कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन श्री.प्रवीण आंधळे सर यांनी केले तर सूत्रसंचालन इयत्ता आठवी ब च्या विद्यार्थीनी कु.कार्तिकी बंगाळे व नीलम कांगणे यांनी संयुक्तपणे केले. तर निलम कांगणे हिने उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी तसेच शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी यांनी सहकार्य केले.



