ताज्या घडामोडी
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर – बापू कुटीचे घेणार दर्शन
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी दीक्षांत समारंभास राहणार उपस्थित

वर्धा, दि.15 (जिमाका) : देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू गुरुवार दिनांक 16 एप्रिल रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.
गुरुवार दिनांक 16 एप्रिल रोजी सकाळी 10.50 वाजता सेवाग्राम आश्रम, बापुकुटी येथे भेट. सकाळी 11.25 वाजता महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात आगमण व विश्वविद्यालयाच्या दीक्षांत समारंभास उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी नागपुरकडे प्रयाण करतील.
राष्ट्रपतींच्या नियोजित दौऱ्यात राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर उपस्थित राहणार आहेत.



