अंगणवाडी- बालवाडी कर्मचारी युनियन आयटक संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी शशिकला मौर्य यांची निवड
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
शालेय जीवनातील आपली सुरुवात ज्या केंद्रापासून होते ते म्हणजे अंगणवाडी तसेच बालवाडी या ताईंच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणजेच आयटक संबंधित संघटनेच्या काल झालेल्या विस्तृत पदाधिकारी बैठकीमध्ये संघटनेच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक संघटनेच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी कॉ.शशिकला मौर्या यांची एकमताने निवड करण्यात आली.
राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या संघटना आयटक संघटना त्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन सदरील संघटना अंगणवाडी कर्मचारी तसेच बालवाडी कर्मचारी यांच्या न्याय हक्कासाठी शासन स्तरावर नियमित पाठपुरावा करत असतात. काल संघटनेच्या जिल्हा सचिव सुरेखा तळेकर यांच्या नेतृत्वाखाली विस्तृत कार्यकारणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदरील बैठकीमध्ये माजी अध्यक्ष यांच्या अकार्यक्षमतेचा पाढा वाचण्यात आला नूतन जिल्हा अध्यक्ष निवड साठी विस्तृत चर्चा करण्यात आली त्यामध्ये एकमताने कॉ.शशिकला मौर्य यांची निवड करण्यात आली.
यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी सुरेखा तळेकर तर शालिनी अहिर शेगाव, माया गव्हाळे शेगाव, अलका राऊत मेहकर, रेखा मुंडे सिंदखेड राजा, अंतकला जाधव सिंदखेड राजा, सिंधू अहिर बुलढाणा, शालिनी सरकटे बुलढाणा, सुनिता काळे देऊळगाव राजा,संगीता केदारे मेहकर, संगीता ठाकूर मलकापूर, तुळसा भोपले संग्रामपूर,सुरेखा तळेकर चिखली, पुष्पा बनकर लोणार, मीना बोराडे खामगाव, सुनंदा सुसर चिखली, कमल गीते चिखली यांच्यासह तालुकास्तरीय तसेच जिल्हास्तरीय पदाधिकारी उपस्थित होते आपण अध्यक्षांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासनाकडून अतिरिक्त जे कामकाज सोपविला जाते त्या संदर्भात आवाज उठवणार असल्याचे सांगितले, तसेच कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीसाठी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी सांगितले


