उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका स्तरीय

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
व्यवस्थापन कक्ष सेलू अंतर्गत परिवर्तन प्रभागसंघ, हिंगणी ‘परिवर्तन प्रभागसंघ’ यांची वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) दिनांक २५ जून २०२६ रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात संपन्न झाली. या सभेमध्ये प्रभागसंघाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासोबतच “माझं गाव आरोग्य संपन्न गाव” या मोहिमेअंतर्गत सर्व सदस्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांचे फोटो पूजनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धन्वंतरी गवळी यांनी केले व प्रास्ताविक प्रभाग समन्वयक जितेंद्र पेटकर यांनी आपल्या प्रास्ताविकात प्रभागसंघाच्या आजवरच्या प्रवासावर प्रकाश टाकला व उपस्थितांचे स्वागत केले.
विनायक पडणिस (जनरल मॅनेजर, IFKA कंपनी): “ग्रामीण भागातील महिलांचा आर्थिक विकास हाच खऱ्या प्रगतीचा पाया आहे. प्रभागसंघाने महिलांना उद्योग आणि रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, यामध्ये कॉर्पोरेट क्षेत्राकडून नेहमीच सहकार्य लाभेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.फिल्ड ऑफिसर (बँक ऑफ इंडिया, हिंगणी): “प्रभागसंघाचे आर्थिक व्यवहार अत्यंत पारदर्शक आहेत. बँकेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी आणि नवीन उद्योगांसाठी विविध कर्ज योजना व आर्थिक साहाय्य देण्यास बँक सदैव तत्पर राहील,” असे त्यांनी सांगितले अंजली बारई (तालुका व्यवस्थापक यांनी परिवर्तन प्रभागसंघाने तालुक्यात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व कॅडर आणि प्रेरिकांचे कार्य कौतुकास्पद आहे,” अशा शब्दांत त्यांनी कौतुक केले.
हिंगणी PHC आरोग्य सेवक यांनी आर्थिक प्रगतीसोबतच उत्तम आरोग्य राखणे तितकेच गरजेचे आहे. ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ या मोहिमेद्वारे प्रत्येक सदस्याची आरोग्य तपासणी करून त्यांना सुदृढ आरोग्याचा संदेश देणे हा या सभेचा मुख्य उद्देश आहे,” असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
परिवर्तन प्रभागसंघाचा आर्थिक ताळेबंद आणि भविष्यातील नियोजन बाबत
प्रभागसंघाच्या कोषाध्यक्ष पुनमताई धनिस्कर व लेखापाल भावना पोकळे यांनी मागील आर्थिक वर्षाचा (२०२५-२६) जमा-खर्च अत्यंत नेटकेपणाने मांडला. तसेच आगामी वर्षात प्रभागसंघ कोणकोणते नवीन उपक्रम हाती घेणार आहे, याचे आर्थिक नियोजनही त्यांनी सदस्यांसमोर सादर केले.
सचिव देविकाताई चौधरी यांनी आपले मत व्यक्त करताना, प्रभागसंघाच्या सर्व सदस्यांच्या एकजुटीमुळेच आपण हे यश संपादन करू शकलो, अशी भावना व्यक्त केली. शेवटी
अध्यक्षीय भाषणात प्रभागसंघाच्या अध्यक्षा आशाताई जाधव म्हणाल्या, “परिवर्तन प्रभागसंघाचे उद्दिष्ट केवळ आर्थिक स्थैर्य मिळवणे नसून प्रत्येक कुटुंब आरोग्यदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करणे हे आहे. आगामी काळात आपण सर्वांच्या साथीने हिंगणी परिसराचा कायापालट करू.”
सभा यशस्वी करण्यासाठी अजिंक्य सावरकर (CAM), लक्ष्मी नागोसे (CLM), सर्व प्रेरिका ताई आणि सर्वच कॅडर कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमाच्या शेवटी नीताताई गोमासे यांनी उपस्थित सर्व मान्यवर, आरोग्य पथक आणि सदस्यांचे आभार मानले. राष्ट्रीय गीताने सभेची सांगता झाली.


