मोहरमनिमित्त आ. जोरगेवार यांनी घेतले गैबीशाह वली दर्ग्याचे दर्शन
जिल्हा कारागृहात चादर अर्पण; सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी केली प्रार्थना

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : मोहरमच्या पवित्र पर्वानिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा कारागृह परिसरातील हजरत मखदूम उर्फ गैबीशाह वली यांच्या पवित्र दर्ग्याला भेट देत दर्शन घेतले. यावेळी त्यांनी श्रद्धेने समाधीस्थळी चादर अर्पण करून जिल्ह्यात सुख, शांती, बंधुभाव आणि समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना केली.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री रविंद्र गुरुनुले, सवित दंढारे, अजय जयस्वाल, बलराम डोडाणी, रशिद हुसेन वंदना हातगावकर, नगर सेवक जितेश कुळमेथे, आशिष मासिरकर, नगरसेवक नितेश गवळी, सिनेट सदस्य निलेश बेलखेडे,जन प्रलय मशाखेत्री, राजकुमार अक्कापल्लीवार, निलिमा वनकर, प्रविण गिलबिले, ईश्वर विरुटकर. भाग्यश्री येरणे, विनोद अनंतवार, दिनकर सोमलकर, हर्षदा गर्गेलवार, आकाश जुनमलवार, मनिषा पडगेलवार हिमांशु पाल आदींची उपस्थिती होती.
मोहरमनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्हा कारागृहाचे प्रवेशद्वार भाविकांसाठी खुले करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी कारागृहात भेट देऊन येथे असलेल्या गैबीशाह वली यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. कारागृह दरगाह कमिटीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी आ. जोरगेवार यांनी बांधवांना मोहरमच्या शुभेच्छा देत हा सण त्याग, बलिदान, मानवता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा असल्याचे सांगितले. विविध धर्म आणि पंथांमध्ये परस्पर आदर, सलोखा आणि बंधुभाव टिकून राहणे हीच आपल्या समाजाची खरी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले.
मोहरमच्या निमित्ताने जिल्हा कारागृहातील हजरत मखदूम उर्फ गैबीशाह वली यांचा दर्गा सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आला होता. त्यामुळे पहाटेपासूनच हजारो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. विविध धर्मीय नागरिकांनी दर्ग्यात दर्शन घेऊन प्रार्थना केली.


