ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नाथ जोगी समाजाचे नेते गणेश शेणुरे व रमेश केवट यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा शहरातील नाथ जोगी समाज च्या विकासासाठी अहोरात्र झटणारे श्री गणेश रामण्णा शेणुरे देऊळगाव राजा व श्री.रमेश सखाराम केवट, अंढेरा यांची विमुक्त व भटक्या जमातीच्या नागरिकांना त्यांचे मुलभूत अधिकार व शासनाच्या विविध योजनांचे लाभ मिळण्यासाठी आवश्यक ती ओळख पत्रे शासकीय प्रमाण पत्रे व विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी शासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या नियुक्ती बद्दल श्री.गोविंदराव बोरकर यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला होता.

याप्रसंगी श्री. गोविंद भिकानाथ बोरकर यांनी नाथ जोगी समाज बांधवांच्या करीता दफनभूमी जागा मिळवून घेण्यासाठी सन२०१९ते२०२४पर्यंत शासनाच्या विविध कार्यालयांचा किती तरी त्रास सहन करावा लागला यांचे अनुभव सांगितले. देऊळगाव राजा तालुका स्तरावर भटक्या विमुक्त समाजातील बांधवांच्या विकासासाठी सत्कार मुर्ती कडून अपेक्षा व्यक्त केली. यावेळी श्री.प्रकाश गोवर्धने, प्रकाश अहिरे, बाबुलाल शिवरकर, शिवाजी निकम, शिवशंकर दुड्यार, ज्ञानेश्वर देव्हरे, गजानन बिथरे, ज्ञानेश्वर परसने, संतोष बिथरे, विजय शेणुरे,शिवराम मोरे, सचिन बोरकर, सौ.अनुराधा बोरकर,सौ.पुष्पाबाई बोरकर, ज्ञानेश्वरी बोरकर, ईश्वरी बोरकर उपस्थित होत्या, कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री प्रकाश अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री बाबुलाल शिवरकर यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये