आंबेधानोरा येथे महिला सरपंचांचा सत्कार व महिला मेळावा उत्साहात संपन्न
आमदार सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभूर्णा :- ग्रामीण भागाच्या विकासात महिलांचे नेतृत्व निर्णायक ठरत असल्याचे प्रतिपादन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आंबेधानोरा येथे बंडूभाऊ बुरांडे मित्र परिवार यांच्या वतीने रविवार (दि.८) ला आयोजित महिला सरपंच सत्कार व महिला मेळाव्यात केले. महिलांच्या सशक्त सहभागामुळेच ग्रामपंचायती अधिक सक्षम होत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.स्थानिक स्वराज्ज संस्थांमध्ये आपल्या नेतृत्वातून गावाच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या व ग्रामविकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पोंभूर्णा तालुक्यातील महिला सरपंचाचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
आमदार मुनगंटीवार यांनी महिलांनी राजकीय, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रात पुढे येण्याचे आवाहन करत महिला सक्षमीकरणाच्या शासनस्तरावरील विविधयोजनांचा प्रभावी लाभ घ्यावा असेही सांगितले. कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार सुधीर मुनगंटीवार तर अध्यक्षस्थानी माजी सभापती अलका आत्राम यांची उपस्थिती होती.प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपसभापती विनोद देशमुख, नगरसेवक रवी लोणकर,माजी सरपंच बंडू बुरांडे,सरपंच निरंजना मडावी,सरपंच शालिनी सीडाम,भाजपाचे सिताराम मडावी,मनोज रेगुलवार,मधुकर टिकले,छाया जंगमवार,कुंदा जुमनाके, पपीता पोलपलवार,यांची प्रमुख उपस्थिती होती महिला सरपंचांनी गावपातळीवर राबवलेल्या विकासकामांमुळे स्वच्छता, आरोग्य, शिक्षण व पायाभूत सुविधांमध्ये सकारात्मक बदल घडत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
महिलांच्या नेतृत्वाला बळ देणे ही काळाची गरज असून महिलांचा सन्मान म्हणजे समाजाचा सन्मान असल्याचे मत मुनगंटीवार त्यांनी व्यक्त केले. महिला मेळाव्यात महिला सक्षमीकरण, स्वयंसहायता बचत गट, रोजगारनिर्मिती तसेच शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला विविध गावांतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.आयोजकांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बंडू बुरांडे यांनी तर आभार रंजीत गेडाम यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन एकता बंडाबार यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले.
सत्कारमूर्ती सरपंच – किरण डाखरे,निरंजना मडावी,शालिनी सिडाम,पपीता तोडसाम,ठामेश्वरी लेनगुरे,रोहिणी नैतान,संगीता गव्हारे, कांता मडावी,मीनाक्षी ढुमणे,जयश्री अर्जुनकार,संगीता कुळमेथे,पुष्पा कुळमेथे,सनिता मेश्राम,शुभांगी कुत्तरमारे, आशा तोडसे,वनिता वाकुडकर,संगीता तेलसे,वर्षा पिपरे, दर्शना जुमनाके,संगीता गणवीर उपस्थित होते.



