ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिबगांव येथे कलार समाज संघटना तर्फे कॅन्सर,निःशुल्क मोतीबिंदू उपचार, शस्त्रक्रिया व आरोग्य शिबिराचे आयोजन

परिसरातील जनतेने लाभ घ्यावे - राकेश गोलेपल्लीवार अध्यक्ष कलार समाज

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

जिबगांव येथे कलार समाज संघटना तर्फे निःशुल्क मोतीबिंदू उपचार, शस्त्रक्रिया व आरोग्य शिबिराचे आयोजन महात्मे आय बँक हॉस्पीटल नागपूर व जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती चंद्रपूर द्वारे करण्यात आले असून सर्व जनतेनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन राकेश गोलेपल्लीवार अध्यक्ष कलार समाज तथा सदस्य ग्रा.प.जिबगांव यांनी केले आहे.

सदर शिबिरात डॉ. महात्मे रुग्णालयाचे नेत्रतज्ञ आपली सेवा उपलब्ध करुन देतील.

निवड झालेल्या गरजू रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया डॉ. महात्मे नेत्रपिडी व रुग्णालय नागपूर येथे मोफत केले जाईल.

नागपूर येण्या-जाण्याची, भोजनाची, निवासाची व्यवस्था निःशुल्क केल्या जाईल.

शस्त्रक्रिया करीता येताना निवडणुक कार्ड, राशन कार्ड व आधार कार्ड ची झेरॉक्स सोबत आणावी.

निःशुल्क नेत्र तपासणी व २००/- रुपयात गरजूंना अल्प दरात चष्मा उपलब्ध करण्यासाठी डॉ. नितीन बोमनवार एसोसिएट डायरेक्टर, सर्जिकल ऑन्कोलॉजी एचसीजी कॅन्सर सेन्टर, नागपुर यांचे सहकार्य लाभणार आहे.

खालील लक्षणांसाठी अवश्य भेटावे:तोंड किंवा जोभमध्ये अल्सर किंवा गाठ/ट्यूमर, अन्न गिळताना त्रास,तोंड उघडताना समस्या,अनियमित रक्तस्त्राव व मासिक पाळीशी संबंधित अडचणी,शरीराच्या इतर भागांवर ट्युमर,स्तनातील गाठ,मानेतील गाठ आदी समस्यांसाठी नक्की भेट देऊन इलाज करून घ्यावे.

सदर शिबिर दिनांक १२/०२/२०२६ ला रोज गुरुवारला सकाळी ११ ते ३ वाजेपर्यत ग्रामपंचायत सभागृह जिबगांव येथे होणार आहे.

या शिबिराचे उदघाटक म्हणून दिनेश चिटनुरवार,माजी बांधकाम सभापती जि. प. चंद्रपूर,सहउदघाटक नसिंगभाऊ गनवेणवार, सल्लागार कलार समाज सावली,अध्यक्ष चंदुजी मारगोनवार, माजी पं.स.मुल,राजु पा. मारकवार सामाजीक कार्यकर्ता राजगड, प्रकाश प्रा. मारकवार, माजी सदस्य जि.प. चंद्रपूर,डॉ. नितीन बोमनवार, नागपूर, डॉ.विजय शेंडे, सावली, अविनाश तालापल्लीवार, शिक्षक चामोर्शी उपस्थित राहणार आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये