ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बंद भाड्याच्या दुकानात मध्यरात्री चोरी

भद्रावती मुख्य मार्गावरील लोकमान्य शाळेजवळील चाळीतल घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या लोकमान्य शाळेजवळील चाळीतील बंद असलेल्या भांड्याच्या दुकानात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. दिनांक ७ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचे ताळे फोडून विक्रीसाठी ठेवलेले भाड्याचे साहित्य चोरून नेले असून या साहित्याची किंमत सुमारे १० हजार रुपये असल्याचे सांगण्यात येते.

सदर दुकान हे भाड्याने साहित्य देण्याचा व्यवसाय करणारे असून, घटनेच्या वेळी दुकान बंद होते. पहाटेच्या सुमारास दुकानमालक राजू गिरडकर यांनी दुकान उघडण्यासाठी आल्यावर तुटलेले ताळे व आतून साहित्य गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तत्काळ त्यांनी या घटनेची माहिती भद्रावती पोलीस ठाण्यात दिली.

घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून, अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. मुख्य मार्गालगतच चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अलिकडच्या काळात शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने, पोलिसांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणी पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये