ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावतीत गांजाची वाहतूक करणारे दोघे अटकेत

१.६२ लाखांचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

            दि. ८ फेब्रुवारी २०२६ — नागपूर ते चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरून गांजासदृश अंमली पदार्थाची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर भद्रावती पोलिसांनी मानोरा फाटा परिसरात नाकाबंदी केली. यावेळी लाल-काळ्या रंगाची जुनी वापरती होंडा शाईन (क्र. एमएच ४० सीएन ३९६६) थांबवून तपास केला असता दोघा तरुणांकडून गांजासदृश अंमली पदार्थ जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीवरील आरोपी क. १ हर्षल राजेंद्र रक्षित (वय २४, रा. पंचशील नगर, काटोल, जि. नागपूर) व आरोपी क. २ अंशुमन रवींद्र वीर (वय २४, रा. येनवा, ता. काटोल, जि. नागपूर) अशी त्यांची नावे आहेत. पंचासमक्ष झडतीदरम्यान आरोपी क. २ च्या ताब्यातील काळ्या रंगाच्या बॅगेत ३ किलो ११६ ग्रॅम गांजासदृश अंमली पदार्थ (किंमत अंदाजे ₹६२,३२०) आढळून आला.

यासह वाहतुकीसाठी वापरलेली होंडा शाईन दुचाकी (₹७०,०००) व दोन अँड्रॉइड मोबाईल (₹३०,०००) असा एकूण ₹१,६२,३२० किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात सपोनि. संजय मिश्रा, मोहन धोंगडे, पोउपनि. संतोष केदार, पोउपनि गजानन तुपकर, महेंद्र बेसरकर, गोपाल आतकुलवार, जगदिश झाडे, धर्मराज मुंडे, संतोष राठोड, खुशाल कावळे, योगेश घाटोडे, कोमल मोहजे, यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये