ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिनेस्टाइल पाठलागानंतर टिप्पर चालकांनी रेती सांडऊन पळ काढला., दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

महसूल आणि पोलीसांच्या संयुक्त पथकाची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 अवैध रेती वाहतुकीविरोधात महसूल व पोलीस प्रशासनाने कारवाई तीव्र केल्याने रेती माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. तहसीलदार वैशाली डोंगरजाळ व पोलीस निरीक्षक ब्रह्मागिरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सिनेस्टाइल पाठलाग करून अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई केली. जप्त केलेले टिप्पर पोलीस स्टेशनला न लावता चालकांनी रेती रस्त्यावर सांडऊन पळ काढला. त्यामुळे, दोन्ही टिप्पर चालकांविरुध्द देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 या प्रकरणात कविता माणिकराव सिरसाट (वय ४७, व्यवसाय – महसूल सेवक, रा. देऊळगावमही, ता. देऊळगाव राजा) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी म्हणून लक्ष्मण पवार व गणेश नागरे (रा. सिनगाव जहागीर, ता. देऊळगाव राजा) यांची नावे निष्पन्न झाली आहेत.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, दि. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ४ ते ५ वाजेदरम्यान, सिनगाव जहागीर फाटा ते देळे गव्हाण दरम्यान तहसीलदार यांच्या पथकासोबत अवैध रेती वाहतुकीविरोधात पेट्रोलिंग सुरू असताना विना नंबरचा पांढऱ्या रंगाचा टिप्पर संशयास्पदरीत्या येताना आढळून आला. तपासणी केली असता, त्यामध्ये अवैधरीत्या चोरून नेण्यात येणारी सुमारे चार ब्रास रेती (अंदाजे किंमत २० हजार रुपये) असल्याचे निदर्शनास आले.

सदर टिप्पर पोलीस ठाण्यात आणण्याचे आदेश दिल्यानंतर, टिप्पर चालकांनी राजूर रोडच्या दिशेने अतिवेगाने व बेजबाबदारपणे वाहन चालवत, टिप्परमधील रेती रस्त्यावर सांडऊन पळ काढला. यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेनंतर पोहेकॉ. भास्कर सानप यांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक ब्रह्मागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. अवैध रेती वाहतुकीविरोधात प्रशासनाची कारवाई यापुढेही अधिक तीव्र केली जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये