कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समितीच्या स्वच्छता मोहिमेस नगरसेवक राजेश बदखल यांची साथ
अखेर गवराळा स्मशानभूमी स्वच्छतेला लाभला मुहूर्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शहरातील प्रभाग क्रमांक १४ येथील सर्वधर्मीयांची एकमेव स्मशानभूमी अनेक समस्यांनी ग्रासलेली होती.अवतीभोवती अनेक काटेरी झुडपे, सर्वत्र कचरा घाण, रात्रीला असामाजिक तत्वांचा वावर यामुळे अंत्यक्रिया पार पाडण्यासाठी आलेल्या शोकाकुल कुटुंब व आप्तांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागत होता.
वॉर्डातील कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समिती चे अध्यक्ष मंगेश हनुमान येरमे व जेष्ठ सदस्यांनी पुढाकार घेत चक्क स्मशानभूमी स्वच्छतेचा वसा घेतला मात्र मानवी धर्मातून एवढे अवघड कार्य तडीस नेणे कठीण असल्याने स्थानिक नगर परिषद भद्रावती कडे निवेदने देऊन स्मशानभूमीच्या स्वच्छता व आवश्यक सुविधांबाबत पाठपुरावा करण्यात आला. मात्र यापूर्वी कोणत्याही सदस्याने याकडे गंभीरतेने लक्ष दिले नाही हे विशेष…परिणामतः दिवसोंदीवस या स्मशान भूमीची अवस्था गंभीर होत गेली.
नगर परिषद भद्रावती सार्वत्रिक निवडणूक २०२५ संपताच नगराध्यक्ष म्हणून माजी उपाध्यक्ष प्रफुल चटकी यांनी स्वच्छतेला प्राधान्य देत अनेक गैरसोयीची मैदाने नाल्या, रस्ते स्वच्छतेला प्राथमिकता देण्याचा सपाटा लावला.
नगर परिषद भद्रावती करिता स्वीकृत नगरसेवक म्हणून राजेश शामराव बदखल यांची तत्परता, सक्रीय सहभाग वृत्ती हेरून कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता गणपती वॉर्ड गवराळा तर्फे त्यांना स्वच्छतेच्या अभियानात सहभागी होण्यास आवाहन केले असता त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पासष्ट ते नव्वदच्या वयोगटातील जेष्ठ सेवानिवृत्त सदस्यांच्या स्वच्छता मोहिमेत सदोदित सक्रीय सहभागी होण्याचा संकल्प घेतला.
नवनिर्वाचित सदस्य म्हणून समितीतर्फे त्यांचा सत्कार करतेवेळी स्मशानभूमीची जीर्ण व निर्जीव अवस्था लक्षात आणून देताच त्यांनी आज दिनांक.०४ फेब्रुवारी पासून कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समिती च्या अध्यक्ष मंगेश हनुमान येरमे, जेष्ठ सदस्य अरुण येरकाडे, दिनकर पा. घाटे संजय शामराव बदखलआदी सदस्यांसह स्वतः उपस्थित राहून स्मशानभूमी स्वच्छतेला मूर्त रूप देण्याची मोहीम सुरू केली. माझ्या कारकीर्दीत पुरेश्या निधीची तरतूद करून, योग्य प्रकाश व्यवस्था, सांडपाणी निचरा, रोड, आप्तांना व अंत्ययात्रवेळी उपस्थिताना बसण्यास बेंचेस ची व्यवस्थेसह या स्मशानभूमीच्या सौंदर्यीकरणास आपण प्राधान्य देऊ असे आवर्जून सांगितले.
जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्र मंडळ गवराळा संचालित कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समिती च्या जेष्ठ सेवानिवृत्त सदस्यांच्या स्वच्छतेचा सहभाग पाहून मी प्रभावित झालो. तद्वतच एक स्वीकृत सदस्य म्हणूनच नव्हे तर या प्रभागाचा एक जबाबदार नागरिक म्हणून या वॉर्डातील शक्य तेवढ्या सोई सुविधा उपलब्ध करून देण्यास मी यापुढेही कटिबद्ध राहण्याचा प्रयत्न करेल.
राजेश शामराव बदखल, स्वीकृत सदस्य न. प. भद्रावती



