ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिक्षणातून रोजगाराकडे _ निळकंठराव शिंदे महाविद्यालयीन प्लेसमेंट सेलचे यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

      इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह कंपोनंट प्रायव्हेट लिमिटेड चाकण पुणे या कंपनीमध्ये नियुक्त झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्त पत्रे व गुलाब पुष्प देऊन महाविद्यालयाद्वारे गौरविण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे होते व सचिव डॉ. कार्तिक शिंदे, प्राचार्य डॉ. लेमराज लडके ,प्लेसमेंट सेलच्या अध्यक्षा डॉ. अपर्णा धोटे यांची प्रमुख उपस्थिती होती महाविद्यालयाद्वारे दिनांक १६ जानेवारी २०२६ ला रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

   या रोजगार मेळाव्यात पुणे येथील इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह कंपोनंट प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीने सहभाग घेतला. या प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये विज्ञान व कला शाखेच्या पदवी व पदव्युत्तर अंतिम वर्षाला असलेल्या ६५ विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या त्यापैकी ४३ विद्यार्थ्यांची निवड झाल्याचे महाविद्यालयाला कंपनीने कळविले आहे.

या निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी पहिल्या टप्प्यात दहा विद्यार्थी दिनांक ९ फेब्रुवारी रोजी संबंधित कंपनीत रुजू होणार आहेत व उर्वरित विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने ऑफर लेटर देऊन कंपनी त्यांना रुजू करून घेणार आहे. दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ ला कंपनीत रुजू होणाऱ्या विद्यार्थ्यांना कंपनीचे ऑफर लेटर व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्यात याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर लेमराज लडके यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की आमच्या महाविद्यालयीन प्लेसमेंटमध्ये एवढ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड होण्याचे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयाच्या इतिहासातील पहिलीच वेळ असावी असे त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी डॉक्टर कार्तिक शिंदे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये विद्यार्थ्यांना मिळालेले यश हे त्यांच्या कठोर परिश्रमाचे आणि प्राध्यापकांच्या योग्य मार्गदर्शनाचे फलित आहे याप्रसंगी बोलताना डॉक्टर विवेक शिंदे म्हणाले की महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह कंपोनंट्स प्रायव्हेट लिमिटेड चाकण पुणे येथे झालेली निवड हे निश्चितच अभिमानाची बाब आहे आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी नव्हे तर कौशल्य शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा आहे आमचे महाविद्यालय विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख शिक्षण तांत्रिक ज्ञान आणि व्यक्तिमत्व विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.

विद्यार्थ्यांनी या संधीचे सोने करून स्वतःचे तसेच महाविद्यालयाचे नाव उज्वल करावे भविष्यातही अशा प्लेसमेंटच्या माध्यमातून अधिका अधिक विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा आमच्या महाविद्यालयाचा मानस आहे निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय महाविद्यालयातील मार्गदर्शन अध्यापक वर्गाचे सहकार्य व प्लेसमेंट सेलच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना दिले या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा व प्लेसमेंट मधील कामगिरीचा आलेख उंचावल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये