Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

अज्ञात वाहनाची मोटारसायकलला धडक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा अशोक डोईफोडे

कुंभारी बायपास जवळ अज्ञात वाहनाने मोटारसायकली ला धडक दिल्याने मोटारसायकलरस्वार जखमी झाल्याची घटना 18 डिसेंबर रोजी रात्री घडली. सविस्तर वृत्त असे की फिर्यादी सूर्यभान रामराव काकड रा पिंपळगाव हे देउळगावराजा येथे जनावरांना ढेप आणण्यासाठी त्यांची मोटारसायकल क्रमांक MH-28-P-4086 ने जात असताना कुंभारी गावाजवळ आल्यानंतर त्यांच्या मोटरसायकल ला देउळगावराजाकडुन एक चारचाकी वाहण राँग साइडने आले.

त्यावेळी फि ने त्यांची मोटारसायकल रोडच्या खाली घेतली असता समोरून येणा-या अज्ञात वाहण चालकाने त्याचे वाहण जोराने चालवुन मोटारसायकलच्या हँडलला कट मारल्याने फिर्यादी हे त्यांचे मोटारसायकल सह खाली पडल्याने त्यांन उपचारकामी सरकारी दवाखाना देउळगावराजा येथे नेले असता ते शुदधीवर आल्याने त्यांचे डावे हाताच्या खांदयावर, उजव्या हाताच्या बोटाला व पायाला मार लागलेला दिसला नंतर त्यांना पुढील उपचारकामी जालना येथे दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती पोलिस ठाण्यात दिली असून पोलिसांनी अज्ञात वाहनचालक विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल माधव कुटे करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये