ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पो.स्टे. वडनेर अप.क्र. ४४६/२०२३ कलम ३२४, ३२३, ५०४ भादंवि मधील आरोपीस 1000रुपये दंड न भरल्यास 15दिवस साधा करावास ची शिक्षा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 श्री. ए.बी. इंगोले, कोर्ट विद्यमान प्रथम श्रेणी न्यायालय हिंगणघाट कोर्ट नं २ यांनी अप.क्र. ४४६/२०२३ कलम ३२४, ३२३, ५०४ भादंवि मधील आरोपी सुरज उर्फ अभय धनराज बावणे, वय १९ वर्षे, रा. फुकटा त. हिंगणघाट जि. वर्धा यास खालीलप्रमाणे शिक्षा ठोठावली आहे.

शिक्षेचा तपशील :-

१. कलम ३२४, ३२३, ३४ भादंवि मध्ये दोषी ठरविण्यात आले असुन १०००/- रू. दंड, दंड न भरल्यास १५ दिवस साधा कारावासाची शिक्षा.

घटनेचा थोडक्यात तपशील :-

यातील फिर्यादी नामे जनार्धन झोलबाजी नैताम, वय ७६ वर्षे, रा. फुकटा त. हिंगणघाट जि. वर्धा हे घराकडे जात असतां त्यांना रोडवर मोबाईल पडून दिसला, तो हातात उचलला तेवढ्यात आरोपी मोटर सायकलने जवळ आला व गाडी थांबवून म्हणाला को, तु माझा मोबाईल का घेतला असे म्हणून फिर्यादीस शिवीगाळ केली व हाताबुक्यांनी छातीवर मारले तसेच फिर्यादी जवळील लाकडी काठी हिसकावून फिर्यादीचे कमरेवर व डाव्या पायाचे घोट्याजवळ मारून जखमी केले. अशा फिर्यादीचे रिपोर्टवरून पो.स्टे. वडनेर अप.क्र. ४४६/२०२३ कलम ३२४, ३२३, ५०४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्ह्याचा तपास पोहवा. प्रशांत वैद्य, ब.नं. १३८८ पो.स्टे. वडनेर यांनी करुन मा. कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार तर्फे सरकारी अभियोक्ता श्री. रविकुमार चौधरी यांनी संपूर्ण कामकाज पाहिले व पैरवी अंमलदार मपोहवा/पवन वानखेडे, ब.नं. १०६१ यांनी साक्षदारांना मा. न्यायालयात वेळोवेळी हजर करून मोलाची कामगीरी बजावली आहे. तसेच पो.स्टे. वडनेर ठाणेदार स.पो.नि. घनश्याम पाटील यांनी सदर गुन्ह्यातील साक्षदारांना आरोपी विरूध्द प्रभावी साक्ष देणेकरीता वेळोवेळी ब्रिफींग करून योग्य मार्गदर्शन केले आहे. मा. श्री. ए.बी. इंगोले, कोर्ट विद्यमान प्रथम श्रेणी न्यायालय हिंगणघाट कोर्ट नं २ यांनी गुन्ह्यातील आरोपीस कलम ३२४, ५०४, ३४ भादंवि मध्ये दोषी ठरवून १०००/- रू. दंड, दंड न भरल्यास १५ दिवस साधा कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे.

(विनोद चौधरी) पोलीस निरीक्षक स्था.गु.शाखा वर्धा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये