पो.स्टे. वर्धा शहर अप.क्र.०३/२१ कलम ३६३, ३६६ (अ), ३७६ (अब) भा.दं. वि. सह ४, ६, १० पोक्सो मधील आरोपीस ०७ वर्षे सश्रम कारावास व 20000 रुपये दंड ची शिक्षा..
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
विद्यमान मा. श्री. अली डि.जे. २ जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्धा यांनी अप क्र. ०३/२१ कलम ३६३, ३६६(अ), ३७६ (अब) भा.दं.वि. सह ४, ६, १० पोक्सो मध्ये आरोपी जयराम तुकाराम मुळे, वय २२ वर्षे, रा. वडर झोपडपट्टी, आवीं नाका वर्धा यास खालीलप्रमाणे शिक्षा ठोठावली आहे.
शिक्षेचा तपशील :-
१. कलम १० पोक्सो मध्ये ७ वर्ष सश्रम कारावास व २००००/- रू. दंड व दंड न भरल्यास १ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा.
घटनेचा थोडक्यात तपशील :-
यातील फिर्यादीची अल्पवयीन पिडीत मुलगी तिचे घरासमोर खेळत असतांना आरोपी याने तिला तुझी आई बोलवित आहे असे म्हणून विकास विद्यालय येथील बाथरूममध्ये नेवून जबरदस्ती केली. अशा फिर्यादीचे रिपोर्टवरून पो.स्टे. वर्धा शहर येथे अप.क्र. ०३/२१ कलम ३६३, ३६६ (अ), ३७६ (अब) भा.दं.वि. सह ४, ६, १० पोक्सो. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा तपास पोउपनि प्रिती आडे यांनी करून मा. कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार तर्फे सरकारी अभियोक्ता श्री. विनय घुडे यांनी संपूर्ण कामकाज पाहिले व पोहवा राहुल पुरी, ब.नं. ५६१ यांनी साक्षदारांना मा. न्यायालयात वेळोवेळी हजर करून मोलाची कामगीरी बजावली आहे. तसेच पो.स्टे. वर्धा शहर ठाणेदार पो.नि. नागेशकुमार चतरकर यांनी सदर गुन्ह्यातील साक्षदारांना आरोपीविरूध्द प्रभावी साक्ष देणेकरीता वेळोवेळी ब्रिफींग करून योग्य मार्गदर्शन केले आहे, विद्यमान मा. श्री. अली डि.जे. २ जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्धा यांनी गुन्ह्यातील फिर्यादी, पिडीत, साक्षदार तसेच तपासी अधिकारी यांची साक्ष तपासून व उपलब्ध पुरावे यावरून गुन्ह्यातील आरोपी यास कलम १० पोक्सो मध्ये ७ वर्ष सश्रम कारावास व २००००/- रू. दंड व दंड न भरल्यास १ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे.
(विनोद चौधरी) पोलीस निरीक्षक स्था.गु.शाखा वर्धा


