स्वर्गीय हरिभाऊ डोहे गुरुजी यांची पुण्यतिथी साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूरचे संस्थापक स्वर्गीय हरिभाऊ डोहे गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त २० ऑगस्ट रोजी सावित्रीबाई फुले विद्यालय, गडचांदूर येथे भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. आनंदरावजी अडबाले होते. कार्यक्रमाला संस्थेचे सर्व पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष तुळशीराम पुंजेकर, सचिव नामदेवराव बोबडे, सहसचिव उरकुडे, संचालक नोगराज मंगरूळकर, प्रतिष्ठित नागरिक बळवंतराव शिंगाडे, संचालिका डोहे मॅडम, चांदेकर मॅडम, प्रा हेमचंद्र दुधगवळी, प्रा कीर्तिकुमार करमणकर, सेवानिवृत्त प्राचार्य प्रा धनंजय काळे, प्रा गाडगे, मांढरे सर, हेपट सर, खोडके मॅडम उपस्थित होत्या
उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय हरिभाऊ डोहे गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले.
हरिभाऊ डोहे गुरुजी यांनी शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देत सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळाची मुहूर्तमेढ रोवली. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, समाजातील सर्व घटकांपर्यंत शिक्षण पोहोचावे आणि विद्यार्थ्यांमध्ये संस्कार व सामाजिक जाणीव निर्माण व्हावी, यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या दूरदृष्टीतून उभ्या राहिलेल्या शैक्षणिक संस्थेचा विस्तार आज त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेत आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून स्वर्गीय हरिभाऊ डोहे गुरुजी यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याला उजाळा देत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सुंदर व प्रभावी संचालन प्रा. बोडे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी जीवन आडे यांनी उपस्थित मान्यवर, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व उपस्थित सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते,



