वृक्षारोपणाचे नाही तर वृक्ष संगोपनाचे फोटोसेशन करा _ लता हरकुट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस ढासळत चाललेला आहे व याला कारणीभूत सुद्धा या पृथ्वीतलावरील जनताच असून फार मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे कागदोपत्री कोट्यावधी वृक्ष लागवडची नोंद पहावयास मिळते मात्र त्यांचे संगोपनासाठी केवळ खरा वृक्ष प्रेमी समोर येताना दिसत आहे.
वृक्षारोपणाचे नवे तर वृक्ष संगोपनाचे फोटो सेशन केल्यास सगळीकडे हरितक्रांती निर्माण होईल असे प्रतिपादन कमला नेहरू विद्यालयात आयोजित वृक्ष लागवड प्रसंगी जायंटस सहेलीच्या सचिव लता हरकुट यांनी केले व या प्रांगणात जेवढे वृक्ष लागवड केली आहे त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी सहेली ग्रुपने घेऊन त्यांचे नियोजन सुद्धा करण्यात आले आहे ,भविष्यात ऑक्सीजन देणारे वृक्षांचीच लागवड जायंटस परिवाराचे वतीने करून त्यांचे शंभर टक्के संगोपन करण्यात येईल असे याप्रसंगी सांगून शंभर वृक्ष लावण्याऐवजी दहाच वृक्ष लावा मात्र ते जगवा तरच पर्यावरण समतोल राखण्यास मदत होईल.
यावेळी फेडरेशनचे अध्यक्ष जुगल किशोर हरकुट, जायंटस चे अध्यक्ष किशोर आंबुसकर , जायंटस सहेलीच्या अध्यक्ष किरण आंबुसकर, उपाध्यक्ष मालती कायंदे, सुषमा गुप्ता, संजय डोणगावकर, श्याम गुजर, कल्याण चांडगे, राजेश तायडे, ॲड.पुरुषोत्तम धन्नावत, विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश मांटे व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.



