पंचायत समिती कोरपना येथे श्री माधव चिंतमवाड नवीन गटशिक्षणाधिकारी रुजू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर :_ सीपीटीपी अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत संपूर्ण राज्यामध्ये गटशिक्षणाधिकाऱ्यांची पदे भरण्यात आलेली आहे यामध्ये कोरपणा तालुक्यात गटशिक्षणाधिकारी म्हणून श्री माधव दत्ता चिंतामवाड यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. काल ते पंचायत समितीला रुजू झाले असून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना तालुका शाखा कोरपणाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष उमेश आडे संघटनेचे सचिव तथा गडचंदुर शिक्षक पतसंस्थेचे उपाध्यक्ष काकासाहेब नागरे उपाध्यक्ष दादाराव मस्के, नादीर भाई शेख व गजानन तिडके उपस्थित होते. पहिल्यांदाच स्वतंत्र व पूर्ण वेळ गटशिक्षणाधिकारी आपल्या कोरपणा चालू केला लाभलेले आहेत. यापूर्वी ते विक्रीकर विभागात निरीक्षक पदावर दोन वर्षापासून कार्यरत होते एमपीएससी मार्फत त्यांची थेट निवड झाल्याने तालुक्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांच्या या अनुभवाचा निश्चित फायदा होणार आहे. तसेच तालुक्यातील शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सेवा पुस्तक पडताळणी, वैद्यकीय बिले, व शैक्षणिक समस्या ते कशा पद्धतीने सोडवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



