ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लालगुडा जि.प.प्राथमिक शाळेत शालेय व्यवस्थापन समिती गठीत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

कोरपना : कोरपना तालुक्यातील लालगुडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकतीच शालेय व्यवस्थापन समिती गठीत करण्यासाठी शिक्षक पालक मेळावा घेण्यात आला. यावेळी शाळेत मेळावा घेऊन शिक्षक पालकांनी शालेय गुणवत्तेबरोबरच शाळेचा विकास, विद्यार्थी सुरक्षा तथा प्रगती बाबत चर्चा करण्यात आली.

         शालेय शैक्षणिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नविन शासन निर्णया नुसार शालेय व्यवस्थापन समिती गठीत करण्यासाठी चर्चा झाली.याबाबत प्रत्येक वर्गाचे आरक्षण व शालेय व्यवस्थापन समितीच्या शासन नियमा नुसार समिती गठीत करण्यात आली.

          लालगुडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या अध्यक्ष पदी मंगल सिताराम तोडासे,उपाध्यक्ष पदी मिनाक्षी भिमराव कोडापे, सदस्य मंगेश मारोती सोयाम, रमेश झाकू कोडापे, सुरेश देवराव सोयाम, भिमराव चंदू कोडापे, मंगेश दौलत धुर्वे, वंदना संतोष तोडासे, सिताबाई जंगू तोडासे, मनिषा अनिल मेश्राम, माधुरी रमेश कोडापे, अमावस्या मंगल तोडासे,संजू देवराव तोडासे (शि. सदस्य)सचिव गोविंद भाऊराव पेदेवाड अशी समिती गठीत करण्यात आली.यावेळी सर्व पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये