पोंभूर्णा येथील सावित्रीबाई फुले चौकाचा वर्षपूर्ती सोहळा उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभूर्णा :- येथील बस स्टैंड चौकाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नाव देण्याच्या अनुषंगाने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे तालुकाध्यक्ष भुजंग ढोले यांनी पाच दिवसाचे आमरण उपोषण केल्यानंतर २० ऑगस्ट २०२४ ला नगरपंचायत प्रशासनाने बस स्टैंड चौकाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौक नामांतराचे पत्र दिले.त्या घटनेला वर्षपूर्ती झाली.याचे औचित्य साधून सावित्रीमाई फुले चौकाचा वर्षपूर्ती सोहळा महाप्रसाद व विविध कार्यक्रम घेऊन उत्साहात साजरा करण्यात आला.
पोंभूर्णा येथील मुख्य रस्त्यावरील एस.टी.बस स्टैंड चौकाला क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले नाव देण्यात यावे हि मागणी दहा वर्षांपासून रेंगाळत होती.
क्रांतीज्योतीने महिलांना शिक्षणाचा अधिकार दिला त्यांचे नाव चौकाला देण्यासाठी नगरपंचायत कडून कोणतीही ठोस भुमिका घेतल्या जात नसल्याने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदचे तालुकाध्यक्ष भुजंग ढोले यांनी बस स्टॅंड चौकात आमरण उपोषणाचे हत्यार उपसले.पाच दिवसाच्या उपोषणानंतर शेवटी नगरपंचायत प्रशासन नरमाई घेत दि.२० ऑगस्ट २०२४ ला क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले चौक नामांतर झाल्याचा ठराव सुपुर्द केले.या घटनेला दोन वर्ष पूर्ण झाले.याची आठवण म्हणून सावित्रीमाई फुले चौकाचा वर्षपूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला.
यावेळी महाप्रसादाचा कार्यक्रम व विविध कार्यक्रम घेऊन वर्षपूर्ती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
दीपप्रज्वलन,प्रतिमा माल्यार्पन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदचे जिल्हाध्यक्ष विजय लोणबले सर, अ. भा. महात्मा फुले समता परिषदेचे तालुकाध्यक्ष भुजंग ढोले, राहुल सोमणकर, जगन कोहळे,संदीप बुरांडे,इकबाल कुरेशी,एकनाथ बुरांडे, विकास ठाकरे, गणेश ढोले,नरेश ढोले, अनिकेत गुरनुले, सुनिल मोहुर्ले, नितिन दुम्मावार, नंदू मंकीवार,सौ. सुलभा ढोले, अर्पिता ढोले,व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.



