राज्य उत्पादन शुल्क विभाग भरारी पथकाने 31कार्यवाया करून पाच लाख पाच हजार रुपयांचा दारूसाठा केला जप्त..
श्री संजय पाटील अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री एम. ऐ. शेख निरीक्षक यांनी केलेली कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 2/10/2026 ते 8/10/2026 पर्यंत महात्मा गांधी सप्ताह निमित्ताने राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा यांनी वर्धा जिल्ह्यात प्रोरेड करून यातील मुद्देमालात मोहा रसायन आठ हजार साहाशे साठ लिटर आणि गावठी मोहा दारु तीनशे लिटर देशी दारू सोळा लिटर विदेशी दारु अकरा लिटर जप्त करण्यात आली आहे आणि आरोपीवर एकुण 31 गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत आरोपींकडून पाच लाख पाच हजार छाहत्तर रुपयांचा मुद्देमाल व दुचाकी वाहन सुध्दा जप्त करण्यात आलेला आहे.
त्यामधील 21 आरोपींना अटक सुध्दा करण्यात आली आहे. सदरची हि कारवाई श्री संजय पाटील अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली एम. ए. शेख निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक डी. वाय. राऊत राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा दुय्यम निरीक्षक आर. यु. काष्टे राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा जवान अमित नागमोते जवान गिरीश बावणे महिला जवान सुजाता भारस्करे व तसेच वाहन चालक योगेश गांवडे यांनी केलेली आहे…



