ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पो.स्टे. हिंगणघाट अप.क्र. १६७/२० कलम ३२४, ३४ भादंवि मधील आरोपीस 3महिने साधा करावास व 500रुपये दंड ची ठोठावली शिक्षा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

श्री. ए.बी. इंगोले, कोर्ट विद्यमान प्रथम श्रेणी न्यायालय हिंगणघाट कोर्ट नं २ यांनी पो.स्टे. हिंगणघाट अप.क्र. १६७/२०२० कलम ३२४, ३४ भादंवि मध्ये आरोपी क्र. १) शैलेष मनोहर बुरड, वय ४५ वर्षे, २) अमित मनोहर बुरड, वय ४३ वर्षे, दोन्ही रा. मिलींद सोसायटी हिंगणघाट यांना खालीलप्रमाणे शिक्षा ठोठावली आहे,

शिक्षेचा तपशील :-

१. कलम ३२४, ३४ भादंवि मध्ये दोषी ठरविण्यात आले असुन प्रत्येकी ३ महिने साधा कारावासाची शिक्षा व प्रत्येकी ५००/- रु दंड व दंड न भरल्यास ७ दिवस साध्या कारावासाचो शिक्षा.

घटनेचा थोडक्यात तपशील :-

यातील फिर्यादी नामे अशोक तुळशीराम बुडे, वय ६२ वर्षे, रा. मिलींद सोसायटी लबाने चक्की जवळ हिंगणघाट यांचा मुलगा रूपेश सोबत यातील आरोपी हे दारू पिवून वादविवाद करीत असतांना फिर्यादी समजविण्यास गेले असता, आरोपीतांनी फिर्यादीस संगणमत करून आरोपी क्र.१ याने हातात विट उचलून फिर्यादीचे कपाळावर मारून व आरोपी क्र.२ याने उजवे कानाजवळ बुक्कीने मारूण जखमी केले. अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरून व वैद्यकीय अहवालावरून पो.स्टे. हिंगणघाट अप.क्र.१६७/२०२० कलम ३२४, ३४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्ह्याचा तपास पोहवा. राकेश देवगडे, ब.नं ११४४ पो.स्टे. हिंगणघाट यांनी करुन मा. कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार तर्फे सरकारी अभियोक्ता श्रीमती प्रज्ञा शेलार यांनी संपूर्ण कामकाज पाहिले व त्यांना पैरवी अमंलदार मपोहवा सिमा जांगडेकर, ब.नं ९५१ यांनी साक्षदारांना मा. न्यायालयात वेळोवेळी हजर करून मोलाची कामगीरी बजावली आहे. तसेच पो.स्टे हिंगणघाट ठाणेदार पो.नि.श्री. अनिल राऊत यांनी सुध्दा सदर गुन्ह्यातील साक्षदारांना आरोपी विरूध्द प्रभावी साक्ष देणेकरीता वेळोवेळी ब्रिफींग करून योग्य मार्गदशन केले आहे. मा. श्री. ए.बी. इंगोले, कोर्ट विद्यमान प्रथम श्रेणी न्यायालय हिंगणघाट कोर्ट नं २ यावरून गुन्ह्यातील आरोपी यास कलम ३२४, ३४ भादंवि मध्ये दोषी ठरविण्यात आले असून प्रत्येकी ३ महिने साध्या कारावासाची शिक्षा व प्रत्येकी ५००/- रु दंड व दंड न भरल्यास ७ दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे.

(विनोद चौधरी) पोलीस निरीक्षक स्था.गु. शाखा वर्धा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये