तळेगाव शामजी पंत येथे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली मासिक गुन्हे आढावा बैठक संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
तळेगाव शामजी पंत येथे वर्धा जिल्हा पोलिसांची मासिक गुन्हे आढावा बैठक पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल आणि अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन (PPT) द्वारे आपापल्या विभागातील कामकाजाची, कायदा-सुव्यवस्थ्याची व गुन्हे नियंत्रणाची सविस्तर माहिती सादर केली.
पॉवरपॉईंट प्रेडोंटेशनद्वारे विविध विषयांवर मार्गदर्शन व सादरीकरणः
1. राष्ट्रीय व राज्यस्तरीय पदकेः उपविभागीय पोलिस अधिकारी श्री सुशीलकुमार नाईक यांनी पोलिसांना मिळणारी राष्ट्रीय व राज्य पातळीवरील पदके, त्यांचे स्वरूप व त्यासाठीचे निकष याबाबत मार्गदर्शन केले.
2. मोक्का (MCOCA) कारवाई: उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती वंदना कारखेले यांनी संघटीत गुन्हेगारी विरोधातील मोक्का कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व प्रक्रियेवर सादरीकरण केले.
3. प्रगती पोर्टल: पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील, पो. स्टे. सायबर यांनी ‘प्रगती पोर्टल’च्या प्रभावी वापराबाबत माहिती दिली. MRM पोर्टल द्वारे सायबर फसवणूक मध्ये पीडित नागरिकांचे गोठवलेली किंवा ट्रेस झालेली रक्कम प्रत कशाप्रकारे मिळवून दिली जाते याबाबत व रक्कम परत कशाप्रकारे मिळवून दिली जाते याबाबत व GRM पोर्टल द्वारे ज्या निर्दोष खातेदाराचे बँक खात्यातील रक्कम चुकीने गोठवलेली असल्यास त्यांचे खाते अनफीज करण्यासाठी याचा कसा उपयोग होतो याबाबत माहिती सादर केली.
4. एमपीडीए (MPDA) कारवाई: पोलीस निरीक्षक नागेशकुमार चतरकर पो. स्टे. वर्धा यांनी एमपीडीए कायद्यान्वये सराईत गुन्हेगारांवर केली जाणारी कारवाई व प्रस्ताव तयार करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
5. खून प्रकरणातील दोषसिद्धीः पोलीस निरीक्षक डेहनकर पो. स्टे. आर्वी यांनी अप क्र. ६५१/२३ कलम ३०२ भादंवि (खून प्रकरण) मधील आरोपीस मिळालेल्या दोषसिद्धीबाबत (Conviction) माहिती देऊन आरोपिस शिक्षा होण्यासाठी काय प्रयत्न केले गेले पाहिजे याबाबत माहिती दिली.
6. पोक्सो (POCSO) प्रकरणातील दोषसिद्धीः सहाय्यक पोलीस निरीक्षक (ढाकणे पुलगाव) यांनी अप क्र. ३३२/२४ कलम ३६३, ३१६(अ), ३७६ (२) भादंवि सहकलम पोक्सो कायद्यांतर्गत झालेल्या यशस्वी दोषसिद्धीची माहिती देऊन आरोपिस शिक्षा होण्यासाठी काय प्रयत्न केले गेले पाहिजे याबाबत माहिती दिली.
7. कायदा व सुव्यवस्था व सण-उत्सव पूर्वतयारीः सहाय्यक पोलीस निरीक्षक दवणे – जिल्हा विशेष शाखा यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची (L&O) सद्यस्थिती आणि आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.
8. एनसीएल (NCL) पोर्टल: अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे यांनी एनसीएल पोर्टलवरील डेटा नोंदवणे व अद्ययावत माहितीचा प्रभावी वापर कसा करावा यावर मार्गदर्शन केले.
पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल यांचे अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण निर्देश व सूचनाः

