पो.स्टे. हिंगणघाट अप.क्र. ५६४/१९ कलम ३८० भादंवि मधील आरोपीस ए. बी. इंगोले यांनी ठोठावली शिक्षा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
मा. श्री. ए.बी. इंगोले, कोर्ट विद्यमान प्रथम श्रेणी न्यायालय हिंगणघाट कोर्ट नं २ यांनी पो.स्टे. हिंगणघाट अप.क्र. ५६४/१९ कलम ३८० भादंवि मध्ये आरोपी सागर दामोधर ढोकपांडे, वय २६ वर्षे, रा. हनुमान वार्ड हिंगणघाट यांस खालीलप्रमाणे शिक्षा ठोठावली आहे.
शिक्षेचा तपशील :-
१. कलम ३८० भादंवि मध्ये दोषी ठरविण्यात आले असुन १३५ दिवस साध्या कारावासाची शिक्षा व ५००/-रु दंड व दंड न भरल्यास १५ दिवस साध्या कारावासाची शिक्षा.
घटनेचा थोडक्यात तपशील :-
यातील फिर्यादी नामे सौ. मिना बंडूजी भांडेकर, वय ४० वर्षे, रा.सेलू (मुरपाड) ता. हिंगणघाट ही घरी हजर असतांना यातील आरोपीने फिर्यादीचे घरी येवून काकु मला जुवा खेळण्यास ५०००/-रू, द्या असे म्हटले. त्यावरून फिर्यादीने माझेकडे पैसे नाही असे म्हणून घराबाहेर लोकांना बोलविण्यस गेली असता, आरोपीने घरामधील डब्यातील नगदी २०००/-रू. चोरून नेल्याचे फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पो.स्टे. हिंगणघाट अप.क्र. ५६४/१९ कलम ३८० भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा तपास पोना, ओमप्रकाश कोकोडे, ब.नं. ३६३ पो.स्टे. हिंगणघाट यांनी करुन मा. कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार तर्फे सरकारी अभियोक्ता श्री. रवीकुमार चौधरी यांनी संपूर्ण कामकाज पाहिले व त्यांना पैरवी अमंलदार मपोहवा/सिमा जांगडेकर, ब.नं ९५१ यांनी साक्षदारांना मा. न्यायालयात वेळोवेळी हजर करून मोलाची कामगीरी बजावली आहे. तसेच पो. स्टे हिंगणघाट ठाणेदार पो.नि. अनिल राऊत यांनी सदर गुन्ह्यातील साक्षदारांना आरोपी विरूध्द प्रभावी साक्ष देणेकरीता वेळोवेळी ब्रिफींग करून योग्य मार्गदशन केले आहे. मा. श्री. ए.बी. इंगोले, कोर्ट विद्यमान प्रथम श्रेणी न्यायालय हिंगणघाट कोर्ट नं २ यावरून गुन्ह्यातील आरोपी यास कलम ३८० भादंवि मध्ये दोषी ठरविण्यात आले असून १३५ दिवस साध्या कारावासाची शिक्षा व ५००/- रु दंड व दंड न भरल्यास १५ दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे.
(विनोद चौधरी) पोलीस निरीक्षक स्था.गु.शाखा वर्धा



