कोरपना बाजार समितीत ‘शेतकरी भवन’

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना तालुक्यातील शेतकरीबांधवांच्या सोयीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात भव्य व सुसज्ज ‘शेतकरी भवन’ उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने या शेतकरी भवनाच्या बांधकामासाठी २ कोटी ३२ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली आहे.
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतीमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने शासनामार्फत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ योजना राबविण्यात येत आहे. कोरपना येथे अद्याप अशा प्रकारच्या सुसज्ज शेतकरी भवनाची शेतकऱ्यांसाठी मुक्काम व मुलभूत सुविधा उपलब्ध
या नव्या ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ मध्ये शेतकऱ्यांसाठी मुक्कामाची सुविधा, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय तसेच इतर आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये विश्रांतीसाठी योग्य व्यवस्था, आरामदायी खोल्या, आधुनिक स्वयंपाकघर सुविधा आणि इतर सामाजिक सोयीसुविधा देखील दिल्या जाणार आहेत. उपसंचालक (पणन), पुणे यांनी सादर केलेल्या तांत्रिक अहवालाच्या आधारे या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
सुविधा नसल्यामुळे शेतकऱ्यांना मुक्काम व मुलभूत सोयींसाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.
ही गरज लक्षात घेऊन आ. देवराव भोंगळे यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत विशेष आग्रह धरला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश येत
महाराष्ट्र शासनाने सोमवारी (दि. २) निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार या प्रकल्पास अंतिम मंजुरी दिली आहे.
आ. भोंगळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.



