ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कढोलीची सौ.आशाताई व डॉ.संजयराव लोहे यांना “सेवाभावी दाम्पत्य पुरस्कार” जाहीर

"20 वे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचारकृती संमेलन गोयेगाव येथे सन्मानित होणार"

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

दिवं.आनंदाबाई उद्धव मत्ते द्वारा पुरस्कृत यावर्षीचा “सेवाभावी दाम्पत्य पुरस्कार” कढोली खुर्द ता.कोरपणा येथील सौ.आशाताई व डॉ.संजयराव लोहे यांना जाहीर झाला आहे.सौ.आशाताई ह्या वाघदरा त.वणी येथील पावडे कुटुंबातील सुकन्या असून त्यांनी आपला संसाराचा गाडा डॉ.संजयरावाचे सोबतीने व्यवस्थित चालवला आहे.

दोघेही सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे कार्यात सदोदित सहकार्य केले व करत आहे,त्यांच्या सेवाभावी कार्याची दखल घेऊन येत्या 7 व 8 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या गोयेगाव मंडल केरामेरी जि.आसिफाबाद येथील संमेलनात मान्यवरांचे हस्ते “सेवाभावी दाम्पत्य पुरस्कार” प्रदान करण्यात येणार आहे त्यांचे निवडीबद्दल ॲड. राजेंद्र जेनेकर,स्वागतोपाध्यक्ष यमाजी गाऊत्रे, समन्वयक मोतीराम नागोसे,आयोजक नामदेव कुळसंगे,विजयराव लोहे,श्री.चंदनकर,श्री.वसू,श्री.लांडे, गणेश देरकर, सुभाष लोहे,सौ.रंजना लोहे,मोहन देरकर,श्री.उरकुडे आदींनी त्यांचे मनपुर्वक अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये