ताज्या घडामोडी

डॉ. मनिष मुंधडा ह्यांना पितृशोक – प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. गोपाल मुंधडा कालवश

चंद्रपुर बचाव समितीचे होते अध्यक्ष

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी

जितेंद्र चोरडिया चंद्रपूर

चंद्रपूर : चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष, प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ तथा सामाजिक कार्यकर्ते डाॅ. गोपाल मुंदडा यांचे गुरूवार दि. 5 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे 5 वाजता ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आकस्मिक निधन झाले. मृत्यूसमयी ते 78 वर्षाचे होते. चंद्रपूर शहरातील प्रदूषण कमी व्हावे, वाहतुक कोंडी होऊ नये ह्यासाठी जटपुरा गेटचे ऐतिहासिक वारसा जपून उपाययोजना करण्याच्या दृष्टीने देखिल त्यांनी उल्लेखनीय कार्य करण्याचा सातत्याने प्रयत्न केला असुन रुग्णसेवा करीत असताना सामाजिक भान ठेऊन उपेक्षितांना सढळ हस्ते मदत करण्याची वृत्ती त्यांनी कायम जोपासली हे विशेष.

सामाजिक क्षेत्रात नेहमी सक्रीय राहणारे, मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्तीमत्व, अनेकांचे आधारस्तंभ नियतीने हिरावले असून सायंकाळी ५ वाजता शांतीधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, घनश्याम तसेच डॉ. सुशील ही दोन भावंडे, डॉ. मनिष व आशिष ही दोन मुले, सुना, नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे.

डॉ. गोपाल मुंधडा ह्यांच्या आकस्मिक निधनाने केवळ आपले वैयक्तिक नव्हे तर चंद्रपूर करांचे अपरिमित नुकसान झाले असुन सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याने अमीट ठसा उमटविणारे सर्वसमावेशक नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना चांदा ब्लास्टचे संपादक जितेंद्र चोरडिया ह्यांनी व्यक्त केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये