आदिवासी जननायकांचा स्वातंत्र लढ्यातील आणि हक्कासाठीचा लढा प्रेरणादायी – सिनेट सदस्य डॉ.सतीश कन्नाके

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
आदिवासी जननायकांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आणि हक्कासाठीच्या संघर्षात अनमोल योगदान दिले आहे. भगवान बिरसा मुंडा, वीर बाबुराव शेडमाके,तंट्या भिल्ल ,जत्रा भगत, रघुनाथ शहा आणि शंकर शहा यासारख्या आदिवासी जननायकांनी इंग्रजांच्या त्याच्यावर आणि शोषणाविरुद्ध तसेच जल जमीन व जंगलाच्या रक्षणासाठी गुलगुलान घडवून आणली आदिवासी जन्मदायकांनी आपली संस्कृती परंपरा आणि नैसर्गिक संसाधनाचे रक्षणासाठी व सामाजिक सुधारणेसाठी संघर्ष केला. त्यांचे बलिदान शौर्य आणि अन्याय विरुद्धचा लढा आजही प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन चर्चासत्राचे तज्ञ मार्गदर्शक सिनेट सदस्य डॉ सतीश कन्नाके यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठ आदिवासी अध्यासन केंद्र आणि शरदराव पवार महाविद्यालय गडचांदूर च्या राज्यशास्त्र आणि इतिहास विभागाचे वतीने आयोजित “आदिवासी जननायकांचे योगदान” या विषयावरील एक दिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य संजयकुमार सिंह,प्रमुख अतिथी म्हणून संस्था अध्यक्ष डॉ.आनंदराव अडबाले,आयोजक आणि विद्यापीठाच्या आदिवासी अध्यासन केंद्राचे सदस्य डॉ.संजय गोरे,आयोजक इतिहास विभाग प्रमुख डॉ.शरद बेलोरकर इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रास्ताविकातून डॉ.संजय गोरे यांनी विद्यापीठाच्या आदिवासी अध्यासन केंद्राच्या विविध उपक्रमाची माहिती देऊन आदिवासी जन नायकांच्या क्रांती आणि संघर्षाचा इतिहास आजच्या पिढीला अवगत करून त्यांच्या कार्यातून विद्यार्थांनी प्रेरणा घेण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे सांगितले. यावेळी डॉ.सतीश कन्नाके यांचा विद्यापीठ आपल्या गावी या उपक्रमातील विद्यार्थ्यांनी तयार केलेले बांबू शिल्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
या चर्चासत्राचे संचालन डॉ.शरद बेलोरकर यांनी केले तर आभार डॉ.माया मसराम यांनी केले यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वृंद आणि कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते .



