कान्सा येथे २१ फेब्रुवारीला वंध्यत्व निवारण शिबिराचे आयोजन
जिल्ह्यातील तज्ज्ञ पशुवैद्यकीय डॉक्टर राहणार उपस्थित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
पशुसंवर्धन विभाग, चंद्रपूर यांच्या वतीने पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी–२, धानोली (पंचायत समिती, भद्रावती) अंतर्गत मौजा कान्सा येथे दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ रोजी वंध्यत्व निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात जिल्ह्यातील तज्ज्ञ पशुवैद्यकीय डॉक्टर उपस्थित राहून पशुपालकांसाठी कार्यशाळा तसेच पशुसंवर्धनासंबंधी तांत्रिक मार्गदर्शन करणार आहेत. शिबिरामध्ये जनावरांचे लसीकरण, उपचार, खच्चीकरण तसेच आवश्यक त्या शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
या शिबिराचा लाभ कान्सा गावातील तसेच परिसरातील शेतकरी, शेतमजूर व गोपालकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. हे शिबिर पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी–२, धानोली, पंचायत समिती भद्रावती, जि. चंद्रपूर तसेच मदर डेअरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.


