ऐतिहासिक विज्जासन बुद्धलेणीत त्यागमूर्ती माता रमाई जयंती सोहळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती येथील ऐतिहासिक विज्जासन बुद्धलेणी परिसरात रविवार दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता त्यागमूर्ती माता रमाई जयंती सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम वर्षावास आयोजन समिती तथा सम्राट अशोक सार्वजनिक वाचनालय (अभ्यासिका) यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन पूज्य भदंत प्रज्ञाकीर्ती महाथेरो व पूज्य भंते विरियपन्नो यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्षावास आयोजन समितीच्या अध्यक्ष लिनता जुनघरे असणार आहेत.
यावेळी नगराध्यक्ष प्रफुल चटकी, उपनगराध्यक्ष सुधीर सातपुते, अॅड. पूनम वाघमारे, डॉ. सुमित दुर्योधन, सूरज गावंडे, अॅड. मिलिंद रायपुरे, आम्रपाली पाटील, विनयबोधी डोंगरे यांच्यासह अनेक मान्यवर व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
त्याग, समर्पण व सामाजिक परिवर्तनाच्या विचारांची प्रेरणा देणाऱ्या माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त हा सोहळा संपन्न करण्यात येणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वर्षावास आयोजन समिती, विज्जासन बुद्धलेणी, भद्रावती यांच्या वतीने करण्यात आले आहे.



