ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वर्धा जिल्हा पोलीस भरती २०२४-२०२५ (उमेदवारांकरिता सुचना)

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा जिल्हा पोलीस दलात ज्या उमेदवारांनी आवेदन अर्ज सादर केलेले आहे त्या उमेदवारांची पोलीस भरती प्रक्रीया दिनांक ११-०२-२०२६ रोजी सकाळी ०५-०० वा. पासून पोलीस मुख्यालय, वर्धा येथील मैदानावार शारिरीक व मैदानी चाचणी सुरु होणार असल्याने ज्या उमेदवारांना प्रवेशपत्र (हॉल तिकीट) ज्या तारखेचे प्राप्त झालेले आहे त्यांनी त्या, त्या तारखेला सकाळी ०५-०० वा. आवश्यक त्या कागदपत्राचा छायांकीत प्रतीसह (स्वतः साक्षांकीत केलेले) व ०५ पासपोर्ट साईजचे फोटो सोबत आणावेत.



