ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“स्थानिक गुन्हे शाखा वर्धा ने ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा उघडकीस

चोरी गेलेल्या ट्रॅक्टर, ट्रॉली व इतर वाहनासह एकूण 11 लाख 30 हजाराचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

फिर्यादी नामे नारायण शंकरराव कोल्हे, रा. शिरपूर (हिरे) ता. देवळी जिल्हा वर्धा यांनी त्यांच्या मालकीचा ट्रॅक्टर हा वर्धा – यवतमाळ हायवे लगत सर्व्हिस रोड च्या वाजूला उभा केला असता दिनांक 21/01/2026 चे 23:30 वा. ते दिनांक 22/01/2026 चे 07.30 दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेल्याने दिनांक 22/01/2026 रोजी फिर्यादी चे तक्रार वरून पो.स्टे. देवळी येथे अप. क्रमांक 50/26 कलम 303(2) वी. एन. एस. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा वर्धा चे पथक करीत असताना CCTV फुटेज चे आधारे चांदुर रेल्वे जिल्हा अमरावती येथे जाऊन गुन्ह्यात चोरी गेलेला ट्रॅक्टर व आरोपीतांचा शोध घेत असता गोपनीय माहिती मिळाली की मौजा शिरपूर, ता. जिल्हा वर्धा येथून चोरी गेलेला ट्रॅक्टर हा चांदर (रेल्वे) येथे राहणारा मंगेश ढोबळे याने त्याचे जवळ असलेल्या ईको चारचाकी गाडी क्रमांक एम.एच 32 ए एस. 2703 गाडी ने मौजा शिरपूर ता. देवळी जिल्हा वर्धा येथे येऊन लाल रंगाचा महिंद्रा ट्रॅक्टर व लाल रंगाची ट्रॉली चोरी करून आणला आहे अशा गोपनीय माहिती वरुन चांदुर (रेल्वे), जिल्हा अमरावती येथे आरोपीतांचा शोध घेतला असता आरोपी हे मंगेश डोबळे याचे घरी बसून असल्याचे दिसून आल्याने शिताफीने त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव, गाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव अनुक्रमे 1) मंगेश प्रभाकर डोवळे, वय 30 वर्षे, अमरावती, 2) अभिजीत अनिल पेठे, वय 30 वर्षे, 3) नकुल किसन कनासिया, वय 18 वर्षे, सर्व रा. भगवान चौक, माधव वार्ड, चांदुर (रेल्वे) ता. चांदर (रेल्वे), जि. अमरावती असे सांगितले. त्यांना गुन्ह्यातील चोरी केलेल्या ट्रॅक्टर व ट्रॉली बाबत विचारणा केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे सांगितले, सदर आरोपीतांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने पंचा समक्ष आरोपीतांच्या ताव्यातून 1) एक लाल रंगाचा महिंद्रा कंपनीचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर कि. 3,50,000/-रु. 2) एक लाल रंगाची विना क्रमांकाची ट्रॉली कि. 1,50,000/- रु. 3) गुन्हा करतेवेळी वापरलेली मारोती कंपनीची ईको चारचाकी गाडी क्रमांक एम.एच 32 ए एस. 2703 कि. 6,00,000/- रु. 4) तिन अँड्रॉइड मोबाईल कि, 30,000/- रु. असा एकुण जु. कि. 11,30,000/- रु. चा मुद्देमाल जप्नी पंचनाम्याप्रमाणे पांचसमक्ष जप्त केला. सदर आरोपी व जप्त मुद्देमाल ताब्यात घेऊन पो.स्टे. मोहरर व आरोपी क्रमांक 1 ते 3 यांना पोलीस स्टेशन देवळीं यांचे ताब्यात देण्यात आले. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन देवळी हे करीत आहेत.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल, सा., अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. सदाशिव वाघमारे सा., स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा चे पोलीस निरीक्षक मा.श्री. विनोद चौधरी सा यांचे निर्देशाप्रमाणे स.पो.नि. आशिषसिंग ठाकूर, पो. उपनि प्रकाश नागापुरे, सफी मनोज धात्रक, पोहवा हमीद शेख, धर्मेंद्र अकाली, महादेव सानप, आशिष महेशगौरी, दिनेश बोथकर, विशाल मडावी, पोशि रितेश कु-हाडकर, सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये