ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मासळ–पावना नियतक्षेत्रात अवैध वाळू वाहतूक

दोन ट्रॅक्टर जप्त, वनगुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

 मासळ व पावना नियतक्षेत्रात अवैधरित्या वाळू (रेती) उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर वनविभागाने कारवाई करत दोन ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केल्या आहेत. ही कारवाई मंगळवार, ३ फेब्रुवारीला सायंकाळी साडेआठच्या सुमारास करण्यात आली.

संयुक्त वनव्यवस्थापन समिती, पेवरा येथील सदस्यांनी दिलेल्या गुप्त माहितीनुसार वनविभागाच्या पथकाने ही कारवाई केली. विभागीय वन अधिकारी राजन तलमले चंद्रपूर व सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू) विकास तरसे,यांच्या मार्गदर्शनाखाली विकास तरसे,भद्रावती वनपरिक्षेत्र अधिकारी के.डब्ल्यू.धानकुटे यांच्या नेतृत्वात क्षेत्रीय वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

शासकीय राखीव वनातील कक्ष क्रमांक २१९(नियतक्षेत्र मासळ) व कक्ष क्रमांक ९ (नियतक्षेत्र पावना) येथील नाल्यातून अवैधरित्या वाळू उत्खनन करून वाहतूक सुरू असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. यावेळी महिंद्रा ४७५ डीआय ट्रॅक्टर (क्रमांक एमएच-एल-८९९९) तसेच सोनालिका कंपनीचा क्रमांक नसलेला ट्रॅक्टर, अशा दोन ट्रॅक्टरसह ट्रॉली जप्त करण्यात आल्या.

वाहनचालकांकडे वाळू उत्खनन व वाहतुकीसाठी आवश्यक परवाना किंवा कागदपत्रे नसल्याचे आढळून आले. त्यामुळे संबंधित वाहनमालकाविरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी व्ही. आर. ठाकरे, ए. बी. शेळकी, एस. आर. कुळमेथे, बी. के. परचाके, एस. एस.पारवे, यांच्यासह अनिल शेंद्रे, किशोर मडावी, पवन मांढरे, नितीन राऊत, अमरदीप कोल्हे कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

अवैध वाळू उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी यापुढेही अशा प्रकारच्या शोधमोहीमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये