ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तीन पिकअप मधून सात गोवंश तेलंगणा तील कत्तलखान्याकडे 

कोरपना पोलिसांकडून जीवनदान ; सात जण ताब्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना – यवतमाळ जिल्ह्यातून खातेरा – पारडी मार्गे तेलंगणातील कत्तलखान्याकडे निर्देतेने कोंडून एकमेकांना दोरीने तोंड घट्ट बांधून तीन पिकअप वाहना द्वारे नेतांना कोरपना – आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मेहंदी फाटा येथे गुरुवार दिनांक २९ रोजी पाच वाजता नाकाबंदी दरम्यान पकडण्यात कोरपना पोलिसांना यश आले.

यात पिकअप क्रमांक एम एच २९ बी इ ९३४९ अंदाजे किंमत दोन लाख ५० हजार या मधून दोन लाख्या धामन्या रंगाचे गोवंशिय बैल किंमत प्रत्येकी दहा हजार प्रमाणे एकूण वीस हजार , पिकअप क्रमांक एम एच २९ बी इ ७१३८ अंदाजे किंमत दोन लाख पन्नास हजार मधून तीन लाख्या धामणे रंगाचे बैल प्रत्येकी किंमत दहा हजार प्रमाणे एकूण तीस हजार , पिकअप क्रमांक एम एच ३६ एफ ३३९७ अंदाजे किंमत एक लाख ५० हजार मधून दोन गोवंशीय गोरे प्रत्येकी किंमत पाच हजार प्रमाणे एकूण दहा हजार असा एकूण साठ हजार रुपयाचे गोवंशीय जनावरांना तावडीतून सोडवण्यात आले. त्यांच्याकडे जनावराचा दाखला वाहतुकीचे परवानगी याबाबत विचारणा केली असता काही आढळून आले नाहीत. दरम्यान आरोपींची अंगझडती घेतली असता विवो सॅमसंग , नारजो कंपनीचे मोबाईल प्रत्येकी किंमत दहा हजार व एक मोबाईल पंधरा हजारचां असे एकूण ६५ हजार किमतीचे मोबाईल ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत गोवंश जनावरे, मोबाईल, पिकअप वाहने असा संपूर्ण सात लाख ६५ हजाराचा असा संपूर्ण मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

अमोल सुधाकर घुघुल (३२) विकास नामदेव जुनगरे (३३) दोन्ही रा. नेरड त वणी , शेख जिब्रान अखिल शेख (२९) रा.वणी , आकाश गजानन उदकवार (२०) रा. पिंपरड वाडी तहसील झरी, संदीप निंबाजी सोयाम (५०) रा. पिपरड त .झरी

शंकर भगवान आंबोरकर (३६) रा. मुकुटबन, गंगाधर पोचीराम जवादेकर (५२) रा.मुकुटबन,

अशी आरोपीची नावे आहे. या सर्व आरोपी विरुद्ध कलम ५ (अ ),५ (ब),६,९ महाराष्ट्र प्राणी अधिनियम १९७६ सुधारित २०१५ अन्वये सहकलम ११(१) (ड) भारतीय प्राण्यास नि वा अधिनियम १९६० सह कलम १८४ मो वा का अन्वये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही धडक कारवाई पोलीस निरीक्षक लता वाढिवे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरपना पोलिसांनी केली.

कातलांबोडी फाट्यावर दुसरी कारवाई

कतली साठी दोन गोवंशिय जनावर धोपटाळा गावाकडून जात असल्याची माहिती मुखबीराकडून मिळाली. या माहितीच्या आधारावर रविवार दिनांक २९ रोजी

 दुपारी १ वाजून ३० मिनिट वाजता कातलाबोडी फाटा मार्गे कोरपना येथे पायदळ घेऊन जात असताना नाकाबंदी करून एक पांढऱ्या रंगाचा व एक तांबड्या रंगाचा गोवंशीय जनावर निर्दयतेने दोरीने बांधून नेताना आढळून आले. त्यांच्याकडे जनावर खरेदी विक्री चे कुठले ही कागदपत्रे आढळून आले नाही. या प्रकरणी आरोपी. शेख मुनाफ शेख हुसेन (५०), शेख साहिल शेख मुनाफ (१८) दोन्ही रा.कोरपना यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये