डॉ.धनराज खानोरकरांच्या ‘सिमग्याच्या बोंबा अन् चवरीच्या सेंगा’ काव्यसंग्रहाचे लोकार्पण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी येथील प्रसिद्ध कवी,लेखक, पत्रकार व नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख डॉ.धनराज खानोरकर यांचे अस्सल झाडी बोलीतील विनोदी काव्यसंग्रह ‘ सिमग्याच्या बोंबा अन् चवरीच्या सेंगा ‘ या काव्यसंग्रहाचा लोकार्पण सोहळा नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाच्या स्व.हिरालाल भैया सभागृहात नुकताच पार पडला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष शेकोकर तथा शासकिय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ.राजन वानखडेंच्या हस्ते व डॉ रेखा मेश्राम,डॉ मोहन कापगते,डॉ भास्कर लेनगुरे,डॉ अरविंद मुंगोले,डॉ वर्षा चापके,प्रा.रुपेश वाकोडीकरांच्या उपस्थितीत पार पडला.
सदर कवितासंग्रह मुंबईच्या संधीकाल प्रकाशनाने प्रकाशित केला असून झाडीबोली महर्षी डॉ हरिश्चंद्र बोरकरांचे ब्लर्ब आणि नाशिकचे समीक्षक डॉ तुषार चांदवडकरांची प्रस्तावना याला लाभलेली आहे.हे डॉ खानोरकरांचे पाचवे कवितासंग्रह असून बहुचर्चित ‘संजोरी’ व चार संपादित ग्रंथ त्यांच्या नावावर जमा आहेत.या लोकार्पण सोहळयाला महाविद्यालयाचे समस्त प्राध्यापक व रसिक उपस्थित होते.संचालन डॉ मोहन कापगते तर आभार डॉ भास्कर लेनगुरेंनी मानले.



