ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सेवानिवृत्त कर्मचारी संघटनाच्या वतीने महात्मा गांधी यांना अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटना देऊळगाव राजा, सहकार महर्षी भास्कररावजी शिंगणे सार्वजनिक वाचनालय सिव्हिल काॅलनी देऊळगाव राजा,जनसेवा सामाजिक संघटना, देऊळगाव राजा जेष्ठ नागरिक संघटना देऊळगाव राजा यांच्या वतीने विरंगुळा भवन येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
तसेच महाराष्ट्र चे उप मुख्यमंत्री कै.अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, यावेळी संघटनेचे अध्यक्ष बळीराम मापारी, सचिव गोविंदराव बोरकर,अरुण सपाटे, रमेश नरोडे ,प्रकाश अहिरे,मधुकरराव धुळे, प्रा. विजयकुमार रायमल, पंडितराव पाथरकर, घनश्यामजी भंडारी,शांतिलालजी निरफळे, उपस्थित होते.



