भद्रावतीत महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
राष्ट्रपिता महात्मा गांधी नगर विकास मंच, भद्रावती यांच्या वतीने दिनांक ३० जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजता स्थानिक गांधी चौक येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचाचे अध्यक्ष धनंजय गुंडावार यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी मानवंदना देऊन गांधीजींना अभिवादन केले.
या प्रसंगी राष्ट्रपिता महात्मा गांधी नगर विकास मंचचे धर्मेंद्र हवेलीकर, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक ॲड. सुनील नामोजवार, दिलीप ठेंगे, काँग्रेस शहर अध्यक्ष सुरज गावंडे, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेविका सरिता सुर, नगरसेविका पल्लवी तामगडे, कल्पना भुसारी, उषाताई जाधव तसेच रविंद्र पवार, दिलीप मांढरे, सुनील पतरंगे, विनायक येसेकर, संदीप चटपकर आदी मान्यवर उपस्थित होते.



