अज्ञात चोरट्याने लॉक तोडून रोख रक्कम व दागिन्यांची केली चोरी
संपूर्ण मुद्देमाल जप्त ; आरोपीविरोधात गुन्हा नोंद
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन कारंजा (घा) येथे फिर्यादी नामे हरेश रामेश्वर भांगे रा. वार्ड क्र. 10 बिहाडी रोड कारंजा घा. यांचे घरी अज्ञात चोरट्याने दरवाज्याचे लॉक तोडुन घरातील कपाटामध्ये ठेवुन असलेले 1) सोन्याची अंगठी अंदाजे वजन 1 तोळा अंदाजे किंमत 40,000/- रुपये 2) काळ्यामन्याचे डोरले व मनी असलेली अंदाजे वजन 2 ग्राम अंदाजे किंमत 10,000/- रुपये 3) दोन देवाच्या मुर्ती अंदाजे किंमत 5000/- रुपये असा एकुण 55,000/- रुपयाचा मुद्देमाल चोरुन नेल्याने फिर्यादीचे तक्रारीवरुन पोस्टेला अपराध क्रमांक- 874/2025 कलम 305 (अ), 331(3) भारतीय न्याय संहीता अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.
सदर अज्ञात आरोपीचा पोस्टेला पथक तयार करुन आरोपीचा कसोसीने शोध घेतला असता आरोपी नामे अंश उर्फ अंशुल नितीन गजबे वय 23 वर्ष रा. प्लॉट क्र. 198 एन.आय.टि. गार्डन जवळ दत्तात्रेय नगर नागपुर यास ताब्यात घेवुन त्याने गुन्हा केल्याचे कबुल केल्याने आरोपीस अटक करुन त्याचे जवळुन गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला.



