विद्यमान कोर्ट वर्धा यांच्या निकालानुसार व राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा यांच्या आदेशानुसार सेवाग्राम पोलिस स्टेशनमध्ये दारुसाठा नष्ट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी पोलिस स्टेशन सेवाग्राम येथे 34 गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेला(1)विदेशी180एम.एल.1728 शिश्या (2)375 एम एल विदेशी 13 शिश्या (3)750 एम एल विदेशी 12 शिश्या (4)500 एम एल बियर 103 बाॅटल (5) 650 एम एल बियर 24 बाॅटल (6) 180 एम एल देशी 14 शिश्या (7) 90 एम एल देशी 447 शिश्या एकुण किंमत 5,00,950/- रुपये असा एकूण मुद्देमाल कोर्टाच्या निकालानंतर व राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा यांच्या अधिक्षक यांच्या आदेशानुसार पोलिस स्टेशन सेवाग्राम येथील पोलिस निरीक्षक नागेश कुमार चतरकर सेवाग्राम राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस उपनिरीक्षक डी.वाय.राऊत व त्यांचे सहकारी हरीदास सुरजुसे सहाय्यक फौजदार अखिलेश यशपाला पोलिस हवालदार हरीदास काकड पोलिस हवालदार विलास लोहकरे व पंच नंबर (1)मेहमुदीन वाहबुदीन काजी राहणार पवणार व पंच नंबर (2) अरविंद मोतीराम लाडे राहणार पवणार आणि पंच नंबर (3) गणेश हिवरे यांचे समक्ष 34 गुन्ह्यातील देशी विदेशी व बियर असा जु.कि.5,00,950/- रुपयांचा नाश करण्यात आला आहे.



