ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पालकमंत्र्यांच्या हस्ते लोहारा जंगल सफारी गेटचे उद्घाटन

चांदा ब्लास्ट

वनविभागाअंतर्गत चंद्रपूर परिक्षेत्रात येत असलेल्या लोहारा येथे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते लोहारा जंगल सफारी गेटचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार, मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामनुजम, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त अकुनूरी नरेश, ताडोबा प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ला, उपसंचालक (कोर) आनंद रेड्डी, उपवनसंरक्षक योगेश वाघाये, विभागीय वन अधिकारी राजन तलमले, लोहाराच्या सरपंच किरण सिध्दार्थ आदी उपस्थित होते.

लोहरा जंगल सफारी पर्यटन गेटद्वारे वन-वन्यजीव व्यवस्थापन करणे, मानव व वन्यजीव यांच्यात सहजीवन प्रस्थापित करणे, वनांचे शाश्वत जतन करून लोकांचे वनावरील अवलंबन कमी करणे व वनांच्या माध्यमातून ग्रामीणांना रोजगार उपलब्ध देणे, जुनेरस्ते व कुपरस्ते यांचा वापर करून 35 कि.मी. चा परिसर पर्यटनासाठी उपलब्ध करण्यात आला आहे. सदर क्षेत्रात एकूण 15 कृत्रिम पाणवठे व नैसर्गिक लोहारा तलावाचा समावेश आहे.

या क्षेत्रात वाघ, बिबट, रानगवे, अस्वल, रानमांजर, हरीण, चितळ, सांबर, निलगाय, चौसिंगा, सायाळ, रानकुत्रे, मुंगुस, मसण्याउद, सायाळ, रानडुक्कर हे प्राणी तसेच विविध प्रकारची झाडे, पक्षी व विविधरंगी फुलपाखरे यांचा समावेश आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये