कोरपना येथे राष्ट्रवादी कॉग्रेस कडून अजित दादाना श्रद्धांजली वाहिली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अपघाती निधन वार्ता पसरतात गावामध्ये शोक व हळहळ व्यक्त करणारे अनेक नागरिकांनी महाराष्ट्र राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री व अर्थ खात्याचे मंत्री म्हणून अनेक जबाबदारी व सर्व समाज घटकाचा विचार करून लोककल्याणकारी कार्यक्रम राबविणारे शब्दाचे पक्के व दिलेला शब्द पूर्ण करणारे एकमेव राजकीय नेते म्हणून अजितदादा पवारांची ख्याती होती त्यांच्या अपघाती निधनामुळे राज्यामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली असून कणखर व जनसामान्याचे आधारस्तंभ असं त्यांचं नेतृत्व होतं राज्याच्या कोण्या कोपऱ्यात राहणारा कार्यकर्ता असो की त्या भागातील समस्या जाणून प्रश्न मार्गी लावणारे एकमेव नेतृत्व आपल्यातून अचानक निघून गेल्याची वेदना दुःख कार्यकर्त्यांना चटका देऊन जाणारी आहे कोरपणा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी शोकसभा घेऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव आबिद अली भाजप चे संजय मुसळे किशोर बावने अरुण मडावी कॉग्रेस चे विजय पिंपळ शेंडे वहाब भाई शेतकरी संघटने अरुण नवले राष्ट्रवादीचे धनराज जिवने गोपाल मरापे विनोद जुमडे महादेव पेंदोर रमेश डाखरे शांताराम देरकर विजय जिवने सुहेल अली मोहब्बत खान शहेबाज अली विकास टेकाम सोनु शेख प्रेमदास राठोड यांचे सह शेकडो चाहत्यांनी श्रध्दांजली अर्पण करूण दादा च्या कार्याचा आलेख विचारातून मांडला एक दमदार कर्तव्यतत्पर व राज्यातील प्रत्येक क्षेत्राचा अभ्यास करणारा लोकनेता आमच्यातुन निघून गेल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली अजीत दादा अमर रहे च्या घोषणा देण्यात आल्या.



