सनराईज योगा ॲक्टिव्हिटी बेनिफिट वूमन्स ग्रुप तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
सनराईज योगा ग्रुप तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला,सकाळी योगा नंतर साडे पाच वाजता गडचांदूर शहरामध्ये सर्वप्रथम महिलांनी आपल्या घराबाहेर एकत्र येत राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. योगाच्या माध्यमातून सर्व लेडीज एकत्र जोडल्या गेल्या आणि देशप्रेमाची भावना मनामनात जागृत झाली.
सनराईज योगा ॲक्टिव्हिटी ग्रुप कडून गेल्या पाच वर्षांपासून दरवर्षी सकाळी राष्ट्रगीत घेण्याची सुंदर परंपरा जपली जात असून, या उपक्रमातून सहभागी महिलांना बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळतो. या संपूर्ण उपक्रमा साठी ग्रुपच्या संचालिका कुंतल मॅडम यांनी पुढाकार घेऊन मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले.
या कार्यक्रमासाठी पुर्वा धाबेकर, माया आत्राम, अर्चना घोटकर, वैशाली पारधी, भारती राठोड, अनिता केराम, अंजू विश्वास, शोभा मोहुर्ले डॉक्टर कृष्णा ठाकरे, मंदा वडस्कर, पल्लवी रोहणे, पल्लवी सोंनटक्के पल्लवी इंगोले, गेना राठोड, माधुरी चौधरी, स्वाती झाडे, मंगला खामणकर, रंजिता थेमस्कर
यांचे विशेष सहकार्य लाभले.
सर्वांच्या सहभागामुळे आणि उत्स्फूर्त प्रतिसादामुळे प्रजासत्ताक दिन अतिशय शिस्तबद्ध आणि आनंदी वातावरणात पार पडला. अशा प्रकारे सनराईज योगा ॲक्टिव्हिटी बिनिफिट वूमन्स ग्रुप तर्फे २६ जानेवारी हा राष्ट्रीय सण अत्यंत प्रेरणादायी व यशस्वीरीत्या साजरा करण्यात आला.



