ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय येथील 12 वी एम.सी.व्ही.सी.च्या विद्यार्थ्यांना निरोप 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथील 12 वी एम सी व्ही सीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उप प्राचार्य प्रा प्रफुल्ल माहुरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून एम सी व्ही सी विभाग प्रमुख प्रा आरजू आगलावे, प्रा माधुरी पेटकर, प्रा रोशन मेश्राम, सुभाष खुजे होते. वर्ग 11 वी च्या विद्यार्थ्यांनी या निरोप समारंभाचे आयोजन केले होते.

उप प्राचार्य प्रफुल्ल माहुरे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना कठोर मेहनत घेऊन जीवनात यश मिळवून स्वतःच्या पायावर उभे राहावे असे आवाहन केले, प्रा. आरजू आगलावे,प्रा. माधुरी पेटकर, प्रा. रोशन मेश्राम, यांनी सुद्धा मार्गदर्शन केले व परीक्षाठी शुभेच्छा दिल्या, कु फातिमा शेख व कु भारती शहा, यश पातूरकर यां विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थीनी कु टिना गेडाम हिने केले.

कार्यक्रमाला शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये