राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय, सावली येथे तणावमुक्त जीवनावर मार्गदर्शनपर कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय, सावली जि. चंद्रपूर येथे “तणावमुक्त जीवन (Stress Management)” या विषयावर एक दिवसीय मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ऐ. चंद्रमौली होते.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॉ. सुचिता देशमुख यांनी तणाव म्हणजे काय, तो का निर्माण होतो आणि दैनंदिन जीवनात तणावावर कशा प्रकारे मात करता येईल यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या स्पर्धात्मक युगात तणाव अपरिहार्य असला तरी त्याचे योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे.
सकारात्मक विचारसरणी, वेळेचे योग्य नियोजन, नियमित व्यायाम, योग व ध्यान यामुळे तणाव कमी करता येतो.
मोबाईल व सोशल मीडियाचा अतिरेक टाळणे आणि पुरेशी झोप घेणे मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.
समस्या आल्यास संवाद साधणे आणि स्वतःवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रशांत वासाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. देवीलाल वताखेरे यांनी केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना तणावमुक्त व सकारात्मक जीवनशैलीचा संदेश मिळाला.



