खडकी शाळेत उत्साहात साजरा झाला प्रजासत्ताक दिन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकी येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी शालेय काही विद्यार्थी भारत माता, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, डॉ बाबासाहेब आंबेडकर या वेशभूषेत आले होते.
राष्ट्राभिमान, देशभक्ती निर्माण व्हावी तसेच भारतीय स्वातंत्र्यचा जज्वल इतिहासाचे स्मरण व्हावे तसेच संविधानातील मूलभूत हक्क, मूलभूत तत्व आणि नागरिकांचे कर्तव्य यासाठी देशभक्तीपर कवायतीचे आणि सुंदर अशा भाषनांचे आयोजन करण्यात आले होते.. कार्यक्रमांची सुरवात प्रभात फेरीने झाली गावामध्ये महिलांनी सकाळी रोडवर पाणी मारून अतिसुंदर रांगोळी काढली त्यात देशभक्ती पर नारे, देशभक्ती पर गीतयांचा सुरेख असा संगम साधन्यात आला होता. यात सर्व विद्यार्थी, पालक, गावातील नागरिक यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत प्रजासत्ताक दिनाचा जागर करण्यात आला.
या कार्यक्रमास अवंतिका आत्राम सरपंच तथा विनोद तोडसे उपसरपंच,हरिराम किन्नाके अध्यक्ष शाळा व्य. समिती, दौलत मेश्राम, प्रभाकर वेरकडे, सोनू तोडसे,अरुण कुमरे हे शाळा व्य. समिती सदस्य, तथा भोजू गेडाम, देवराव तोडसे, बाळकिशन उरवते, लक्ष्मण उरवते,बापूजी किन्नाके, हे प्रतिष्टीत नागरिक तसेच अंगणवाडी सेविका, इतर पालकवर्ग, गावकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन श्री समरीतकर सर यांनी केले. कार्यक्रमाचे सुंदर नियोजन तथा प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री शत्रुघ्न तुमराम यांनी केले.



