Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

बंगाली कॅम्प रस्त्यावरील अवजड वाहतूक बंद करा

माजी नगरसेवक प्रफुल चटकी यांचे ठाणेदारांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           शहरातील जामा मज्जिद ते बंगाली कॅम्प हा रस्ता अरुंद असून या रस्त्यावर शाळेकरी मुले तथा नागरिकांची मोठी वर्दळ असते. या रस्त्याची क्षमता कमी असून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे हा रस्ता पूर्णतः खराब झालेला आहे.

अलीकडे या रस्त्यावरून एश भरलेल्या मोठ्या अवजड वाहनांची वर्दळ सुरु झाली आहे. या अवजड वाहण्यामुळे या रस्त्यावर अपघाताची शक्यता बळावली आहे. त्यामुळे या रस्त्यावर होणारी अवजड वाहतूक बंद करून रस्ता अवजड वाहनांसाठी प्रतिबंधित करावा अशी मागणी नगर परिषदेचे माजी नगरसेवक प्रफुल चटकी यांनी ठाणेदार अमोल काचोरे यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनातून केली आहे.

या रस्त्यावर आठवडी बाजार भरत असून शाळा सुद्धा आहे त्यामुळे या रस्त्यावर होत असलेली अवजड वाहतूक शाळेकरी मुले तथा नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये